शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मुशान झोखाला विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:36 AM

तालुक्याच्या शेवटच्या टोकावर डोंगरकुशीत वसलेले मुशान झोखा गाव अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या गावाच्या विकासाकडे ना लोकप्रतिनिधी ना प्रशासनाचे लक्ष गेल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देकामांचा अभाव : प्रशासनाची डोळेझाक

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर डोंगरकुशीत वसलेले मुशान झोखा गाव अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या गावाच्या विकासाकडे ना लोकप्रतिनिधी ना प्रशासनाचे लक्ष गेल्याचे चित्र आहे.मुशान झोखा हे गाव खडकी गट ग्रामपंचायत अंतर्गत येते. या लहानशा गावात केवळ ११ कुटुंब मागील ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. दोन वर्षापूर्वी रस्त्यावर माती काम करण्यात आले. या दोन किमीच्या रस्त्यापैकी १ कि.मी रस्त्त्याचे खडीकरण करण्यात आले. मात्र उर्वरित १ कि. मी. मार्गात खडीकरण न झाल्याने आधीच्या कंत्राटदाराने खडीकरण झाल्याचे दाखवून रक्कमेची उचल केल्याची माहिती उघडकीस आली. मुशान झोखा गावाजवळून एक लहान नाला वाहतो. त्या नाल्यावर दहा वर्षापूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधारा तयार केल्यानंतर एकाही वर्षी या बंधाºयात पाणी साचून राहत नसल्याचे गावकºयांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील शेतकºयांसाठी हा बंधारा केवळ नाममात्र ठरत आहे. मुशान झोखा या गावात १०० टक्के आदिवासी समाजबांधव वास्तव्यास आहे. आदिवासींच्या उत्थानासाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करुन त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहेत.पण जिल्हा परिषदेच्या दुर्लिक्षत धोरणामुळे मुशान झोखा गावात अंगणवाडी केंद्र नाही. गावात विजेची सोय आहे पण विद्युत खाबांवर पथदिव्यांचा अभाव आहे.हा परिसर नवेगावबांध परिसराला लागून असल्याने या भागात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. वन्य प्राणी गावात येऊ नये यासाठी गावकºयांनी कुत्रे पाळल्याची माहिती आहे.एका बोअरवेलवर पाण्याची भिस्तया गावाला लागून नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाची सीमा आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक सौर उर्जेवर चालणारी विंधन विहीर आहे. त्या विंधन विहिरीच्या भरोश्यावर गावकºयांची पिण्याच्या पाण्याची भिस्त भागविली जात आहे.सायंकाळी ६ नंतर घरबाहेर पडणे कठीणखडकी गावातून मुशानझोखा गावाकडे जाण्यासाठी १ कि.मी. रस्ता जंगलातून जातो. या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे गावकरी वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे सायंकाळी ६ वाजतानंतर गावाबाहेर पडणे टाळतात. मुशान झोखा मार्गावर विद्युत पथदिवे लावण्याची निंतात गरज आहे.गावातील स्वच्छतेकडे दुर्लक्षमुशान झोखा गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाल्या तयार करण्यात आल्या आहे. मात्र बºयाच दिवसांपासून नाल्यांची साफसफाई न केल्याने त्या केरकचºयांने तुडुंब भरल्या आहेत. गावातील समस्या मार्गी लावण्याकडे ग्रामसेवकाचे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप गावकºयांचा आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी या मुशान झोखा गावात आरोग्य तपासणीकरिता येत नसल्याची खंत एका वयोवृद्ध शेतकºयांनी व्यक्त केली.