कार्यक्रमातर्गत महिला शक्तीचा सत्कार सोहळा म्हणून ई-रिक्षा चालविणाऱ्या स्वयं सहायता बचत गटातील महिलांचे स्वागत उपविभागीय अधिकारी गोंदिया यांच्या करण्यात आले. महिलांच्या सुरक्षतेकरिता आम्ही कटिबद्ध म्हणून शपथ घेत मी घरात, कार्यालयात, समाजात आपल्या आजूबाजूच्या परिसरात मुलांमुलीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही, मुली व महीलांवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक अत्याचार होत असल्यास त्याचा विरोध करणार. मुली व महिलांच्या प्रतिष्ठेस हानी पोहचेल असे, कोणतेही कृत्य करणार नाही. त्याच्या हक्काचा व प्रतिष्ठेचा आदर ठेवीन. अशी आज जागतिक महिला दिनी शपथ घेण्यात आली. नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, अप्पर तहसीलदार अनिल खडतकर, तहसीलदार आदेश डफळ, माविमचे जिल्हा समन्वयक मार्कंड, नायब तहसीलदार गीता सरादे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल ढोणे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कर्मचारी योगेश वैरागडे, प्रदीप कुकडकर, प्रफुल अवघड, राम सोनवणे, हेमंत मेश्राम, भूषण कोरे, प्रीती जेंगठे, उत्कर्ष, तेजस्वी यांनी सहकार्य केले. संचालन व्यवस्थापक उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र,गोंदियाच्या मोनिता चौधरी यांनी केले.
माविमने रिक्षा चालविणाऱ्या महिलांचा केला सन्मान ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:32 AM