लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : चिमुकल्यांची आई अपघातमध्ये मृत्यू पावल्यामुळे दोन सख्खे भावंडे आई विना पोरके झाले. मोठा मुलगा ४ वर्षाचा तर लहान मुलगा ८ महिन्याचा होता. आईच्या अकाली मृत्यूने ही दोन्ही भावंड पोरकी झाली होती. त्यामुळे त्यांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. अखेर दोन्ही भावडांच्या सख्या मावशीने त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर बेरडीपार खुर्शीपार येथील तंटामुक्त समितीने तिचा विवाह मनोजसह लावून दिला.प्राप्त माहितीनुसार बेरडीपार (खुर्शीपार) येथील रहिवासी मनोज हिरागीर यांचा विवाह ज्योतीसह झाला. त्यांना एक चार वर्षाचा व एक आठ महिन्याचा मुलगा आहे. मात्र पाच महिन्यापूर्वी ज्योतीचा अपघाती मृत्यू झाला.त्यामुळे मनोज हिरागीर यांची दोन्ही मुल आईविना पोरकी झाली.आपल्या बहिणीची मुल पोरकी झाल्याचे पाहुन ज्योतीची सख्खी बहिण पूजा हिने त्या दोन्ही मुलांचा सांभाळ व मनोजसोबत लग्न करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर मनोज व पूजाने महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज करुन विवाह लावून देण्याची विनंती केली. त्यानंतर खुर्शीपार येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने मनोज व पूजा हिचा विवाह लावून दिला.या वेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधव शरणागत, सरपंच सरिता राणे, निमंत्रक रतनलाल खोब्रागडे, सहनिमंत्रक वैशाली राणे, सदस्य मिलिंद कुंभरे, धनराज भाष्कर, यादोराव टेंभरे, नत्थुलाल नागपुरे, छबीलाल पटले, मनिराम येळे, सुखदास पटले, शिवदयाल पटले, सुखराम पटले, लक्ष्मी सोनकारे, छाया नागपुरे, द्वारकाबाई पारधी, तिरनबाई भगत, डी.डी. परिहार, विनोद बैकुंठी, नरेश साठवणे, कैलास कासीमबन, दिनेश वैकुंठी, स्वप्नील पर्वते, देवेंद्र ईश्वरगिरी तसेच मनोज व पूजा यांचे कुटुंबीय आणि गावकरी उपस्थित होते.
मावशी झाली दोन चिमुकल्यांची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 10:25 PM
चिमुकल्यांची आई अपघातमध्ये मृत्यू पावल्यामुळे दोन सख्खे भावंडे आई विना पोरके झाले. मोठा मुलगा ४ वर्षाचा तर लहान मुलगा ८ महिन्याचा होता.
ठळक मुद्देतमुसने लावले शुभमंगल : बेरडीपार खुर्शीपार येथील घटना