शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

९ ते १५ मेपर्यंत ३२ रेल्वेगाड्या रद्द

By admin | Published: May 08, 2017 12:51 AM

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे दुर्ग ते रसमडा दरम्यान तिसऱ्या ट्रॅकच्या विस्ताराचे कार्य प्रगतीपथावर आहे.

मेगा ब्लॉक : नॉनइंटरलॉकिंगमुळे गाड्यांचे परिचालन होणार प्रभावित लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे दुर्ग ते रसमडा दरम्यान तिसऱ्या ट्रॅकच्या विस्ताराचे कार्य प्रगतीपथावर आहे. ९ ते १५ मेपर्यंत या ट्रॅकवर नॉनइंटरलॉकिंग व तिहेरीकरणाचे कार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या मुख्य दोन रेल्वे लाईन्सवरील गाड्यांचे परिचालन प्रभावित होणार आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉनइंटरलॉकिंग कार्यामुळे ९ ते १५ मे दरम्यान ३२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यातच १८ गाड्यांचे परिचालन बदलविण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे रुटीन मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकते. या कार्यामुळे काही गाड्यांचे परिचलन प्रभावित होणार आहे. ११ ते १५ मे पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये (६८७०१) रायपूर- दुर्ग मेमू लोकल, (६८७०२) दुर्ग-रायपूर मेमू लोकल, (६८७०९) रायपूर-डोंगरगड मेमू लोकल, (६८७१०) डोंगरगड-रायपूर मेमू लोकल, (६८७०४) दुर्ग-रायपूर मेमू लोकल, (६८७०३) रायपूर-दुर्ग मेमू लोकल, (६८७०५) रायपूर-डोंगरगड मेमू लोकल, (६८७०७) रायपूर-दुर्ग मेमू लोकल, (६८७०८) दुर्ग-रायपूर मेमू लोकल, (५८२०५-५८२०६) रायपूर इतवारी-रायपूर पॅसेंजर व ९, १०, १२ आणि १३ मे रोजी (६८७४४) इतवारी-गोंदिया, (६८७४२-६८७४१) गोंदिया-दुर्ग मेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच ११ मे रोजी (६८७२९) रायपूर-डोंगरगड मेमू लोकल, (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमू लोकल, (६८७२३) डोंगरगड-गोंदिया मेमू लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर १२ मे रोजी (६८७३०) डोंगरगड-रायपूर मेमू लोकल, (६८७७४) गोंदिया-रायपूर मेमू लोकल रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना त्रास होईल. - एक्सप्रेस गाड्यासुद्धा रद्द दुर्ग-जगदलपूर एक्स्प्रेसच्या (८२११) सर्व फेऱ्या ९ ते १५ मे दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच (१८४२५-२६) पुरी-दुर्ग एक्स्प्रेस, (१२८२४-२३) निजामुद्दीन-दुर्ग एक्स्प्रेस, (१२५४९-५०) दुर्ग-जम्मूतवी एक्स्प्रेस, (१८२१३-१४) दुर्ग-जयपूर-दुर्ग, (१८२१५-१६) दुर्ग-जमूतवी या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गंतव्य स्थानकापूर्वी समाप्त होणाऱ्या गाड्या टाटा-इतवारी-टाटा पॅसेंजर (५८१११-१२) ही गाडी बिलासपूरमध्ये रद्द होऊन तेथून टाटासाठी रवाना होईल. झारसुकडा-गोंदिया-झारसुकडा (५८११७-१८) बिलासपूरमध्ये रद्द होऊन तेथून झारसुकडासाठी रवाना होईल. राजेंद्रनगर-दुर्ग-राजेंद्रनगर (१३२८८-८७) बिलासपूरमध्ये रद्द होऊन तेथून राजेंद्रनगरसाठी सुटेल. तसेच कानपूर-दुर्ग (१८२०४) बिलासपूरमध्ये रद्द होऊन दुर्ग-नवतनुआ गाडी(१८२०१) बनून सुटेल. तसेच दुर्ग-नवतनुआ (१८२०१), अजमेर-दुर्ग एक्सप्रेस (१८२०८), दुर्ग-नवतनवा (१८२०५), नवतनुवा-दुर्ग (१८२०२), दुर्ग-कानपूर (१८२०३), नवतनुवा-दुर्ग (१८२०६), दुर्ग-अजमेर (१८२०७), छपरा-दुर्ग (१५१५९), दुर्ग-छपरा (१५१६०) आणि डोंगरगड-बिलासपूर (६८७०६) या गाड्या बिलासपूरमध्ये समाप्त होऊन तेथूनच आपल्या गंत्यव्य स्थानाकडे रवाना होतील. एक्स्प्रेस धावणार पॅसेंजर बनून बिलासपूर-अमृतसर एक्स्प्रेस (१८२३७) ही गाडी बिलासपूर ते दुर्ग, अमृतसर-बिलासपूर (१८२३८) ही दुर्ग ते बिलासपूर, निजामुद्दीन-रायगड एक्स्प्रेस (१२४१०) दुर्ग-रायपूर दरम्यान, नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस (१२८५६) गोंदिया रायपूर दरम्यान, लोकमान्य तिळक टर्मीनस शालीमार एक्सप्रेस (१८०२९) दुर्ग-रायपूर दरम्यान, शालीमार लोकमान्य टर्मीनस (१८०३०) रायपूर-दुर्ग दरम्यान, रायगड-गोंदिया एक्स्प्रेस (१२०६९) रायगड-गोंदिया दरम्यान व गोंदिया-रायगड (१२०७०) ही गाडी गोंदिया-रायगड दरम्यान पॅसेंजर गाडीप्रमाणे चालविण्यात येईल. गंतव्य स्थानकापूर्वी समाप्त होणाऱ्या गाड्या टाटा-इतवारी-टाटा पॅसेंजर (५८१११-१२) ही गाडी बिलासपूरमध्ये रद्द होऊन तेथून टाटासाठी रवाना होईल. झारसुकडा-गोंदिया-झारसुकडा (५८११७-१८) बिलासपूरमध्ये रद्द होऊन तेथून झारसुकडासाठी रवाना होईल. राजेंद्रनगर-दुर्ग-राजेंद्रनगर (१३२८८-८७) बिलासपूरमध्ये रद्द होऊन तेथून राजेंद्रनगरसाठी सुटेल. तसेच कानपूर-दुर्ग (१८२०४) बिलासपूरमध्ये रद्द होऊन दुर्ग-नवतनुआ गाडी(१८२०१) बनून सुटेल. तसेच दुर्ग-नवतनुआ (१८२०१), अजमेर-दुर्ग एक्सप्रेस (१८२०८), दुर्ग-नवतनवा (१८२०५), नवतनुवा-दुर्ग (१८२०२), दुर्ग-कानपूर (१८२०३), नवतनुवा-दुर्ग (१८२०६), दुर्ग-अजमेर (१८२०७), छपरा-दुर्ग (१५१५९), दुर्ग-छपरा (१५१६०) आणि डोंगरगड-बिलासपूर (६८७०६) या गाड्या बिलासपूरमध्ये समाप्त होऊन तेथूनच आपल्या गंत्यव्य स्थानाकडे रवाना होतील. एक्स्प्रेस धावणार पॅसेंजर बनून बिलासपूर-अमृतसर एक्स्प्रेस (१८२३७) ही गाडी बिलासपूर ते दुर्ग, अमृतसर-बिलासपूर (१८२३८) ही दुर्ग ते बिलासपूर, निजामुद्दीन-रायगड एक्स्प्रेस (१२४१०) दुर्ग-रायपूर दरम्यान, नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेस (१२८५६) गोंदिया रायपूर दरम्यान, लोकमान्य तिळक टर्मीनस शालीमार एक्सप्रेस (१८०२९) दुर्ग-रायपूर दरम्यान, शालीमार लोकमान्य टर्मीनस (१८०३०) रायपूर-दुर्ग दरम्यान, रायगड-गोंदिया एक्स्प्रेस (१२०६९) रायगड-गोंदिया दरम्यान व गोंदिया-रायगड (१२०७०) ही गाडी गोंदिया-रायगड दरम्यान पॅसेंजर गाडीप्रमाणे चालविण्यात येईल.