शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मेडिकलला मिळणार सीटी स्कॅन मशिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 9:49 PM

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडीकल कॉलेज) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवैद्यकीय सेवा संचालनालयाने मागविला प्रस्ताव : रुग्णांच्या सुविधेत होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडीकल कॉलेज) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ही बाब हेरुन वैद्यकीय सेवा संचालनालयाने नवीन सीटी स्कॅन मशिनसाठी प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता यांना शुक्रवारी (दि.६) दिले. त्यानंतर अधिष्ठाता यांनी संबंधित विभाग प्रमुखांना त्वरीत प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे.सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात एक सीटी स्कॅन मशीन आहे. मात्र या मशिनमध्ये वांरवार बिघाड येत असल्याने त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागतो. परिणामी खासगी रुग्णालयात त्यासाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. सीटी स्कॅन मशीन बंद राहत असल्याने अनेकदा रुग्णांच्या रोषाला सुद्धा डॉक्टरांना सामोरे जावे लागते. मेडीकलचा सर्व कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच सुरू आहे.हीच बाब लक्षात घेत वैद्यकीय सेवा संचालनालयाने मेडीकल कॉलेजला नवीन सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मेडीकल कॉलेजकडून नवीन सीटी स्कॅन मशिन खरेदीसाठी तातडीने प्रस्ताव मागविण्यात आला आहे. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. रुखमोडे यांनी ६४-सलाईड्स ही नवीन सीटी स्कॅन मशिन मागविण्याचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले आहे.नवीन तंत्रज्ञानापासून निर्मित या मशिनचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, मेडीकल कॉलेज स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. अद्यापही मेडीकल कॉलेजची वैद्यकीय सेवा केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे नवीन सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. आता रू ग्णालयात नवीन मशिन आल्यावर रूग्णांना बाहेर पैसे खर्च करावे लागणार नाही. एकंदर रूग्णांसाठी लाभदायक ठरणार आहे.मशिनसाठी आमदार अग्रवाल यांची मध्यस्थीकेटीएस रूग्णालयात असलेली मशिन नादुरूस्त झाली होती. माज्ञ रूग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी हा विषय राज्य शाासनापर्यंत नेला व मशिन दुरूस्त करवून घेतली होती. त्यावेळीच त्यांनी नवीन मशिन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची मागणीही केली होती. तसेच नवीन मशिनसाठी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचे फलीत असे की, नवीन मशिनच्या तीन कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६६ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे.