शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
3
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
4
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
5
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
7
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
8
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
9
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
10
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
11
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
12
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
13
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
14
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
15
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
16
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
17
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
18
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
19
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

गोंदिया रेल्वे स्थानकात मेडिकल व्हॅन

By admin | Published: September 07, 2016 12:31 AM

वाढत्या रेल्वे ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सची दुरूस्ती व देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाद्वारे सतत काम केले जात आहे.

गोंदिया : वाढत्या रेल्वे ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सची दुरूस्ती व देखरेख ठेवण्यासाठी प्रशासनाद्वारे सतत काम केले जात आहे. अपघातांमुळे वेळोवेळी जीवित व वित्तहानीच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाद्वारे युद्धपातळीवर कामे केली जात आहेत. या कार्यांना योग्य रूप देण्यासाठी आधुनिक यंत्रांची गरज म्हणून गोंदिया स्थानकात सेल्फ प्रोपेल्ड अ‍ॅक्सिडेंट रिलिफ ट्रेन (एसपीएआरटी) उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिला अपघात रिलिफ मेडीकल व्हॅनसुद्धा म्हटले जाते.सततचे वाढते रेल्वे ट्राफीक व मोठ्या ट्रॅक संरचनेमुळे रेल्वे लाईन्सच्या दुरूस्तीसाठी प्रशासन सतत काम करीत आहे. तसेच ब्रेकडाऊनमुळे रेल्वे परिचालन बाधित झाल्यास प्रशासनाद्वारे सतत प्रयत्न करून ती अडचण दूर केली जाते. मात्र अनपेक्षित अपघाताच्या वेळी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सदर अपघात रिलिफ ट्रेन (मेडिकल व्हॅन) उपलब्ध राहणार आहे.सदर व्हॅनमध्ये जखमी प्रवाशांच्या देखभालीसाठी एक लहान आॅपरेशन थिएटर आहे. त्यात प्राथमिक उपचार व छोटे आॅपरेशन केले जाऊ शकतात. या व्हॅनमध्ये आवश्यक औषधी व जवळपास १२ प्रवाशांसाठी बेडची व्यवस्था आहे. अपघातादरम्यान एक डॉक्टर व एक सहायक उपस्थित राहतात. ते पीडितांच्या आवश्यकतेनुसार उपचार करतात.वेळोवेळी उपलब्ध अपघात रिलीफ उपकरणांची तपासणी मंडळाच्या उच्च अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हॅन अपडेट राहण्यास मदत होते. मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी गोंदिया स्थानकात उपलब्ध सदर ट्रेनचे निरीक्षक केले व कार्यप्रणालीची पाहणी केली. (प्रतिनिधी)