महिला खातेदारांसाठी महाराजस्व अभियान : ३१ आॅगस्टपर्यंत मेळाव्यांचे आयोजन आमगाव : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशान्वये तहसीलदारांनी महिला खातेदारासाठी १ ते ८ आॅगस्ट या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महिलांचे गाव पातळीवरील मेळावे १ आॅगस्टपासून घेतले जाणार आहेत. सन २०१६-१७ चे महाराजस्व अभियान १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत राबविले जाणार आहे. त्या अनुषंगाने या काळात महसूल आठवडा या कार्यक्रमाअंतर्गत महिला खातेदारांसाठी गाव पातळीवर मेळावे घेण्यात येणार आहेत. यात कृषी, सहकार, महिला व बालकल्याण विभागाच्या समन्वयातून योजनांची माहिती देणे व महसूल विभागामार्फत महिला खातेदारांच्या अडीअडचणी समजून घेणे व त्याच ठिकाणी निराकरण साजा निहाय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यात, मंगळवारी (दि.२) साजा क्रं.१ घाटटेमनी, साजा क्रं.८ किकरीपार, साजा क्रं.१६ बिरसी व चिरचाळबांध येथे सकाळी ११ ते ५ पर्यंत, बुधवारी (दि.३) साजा क्रं.२ भोसा, साजा क्रं.१२ रिसामा, साजा क्रं.१७ आसोली, साजा क्रं.९ शिवनी, गुरूवारी (दि.४) साजा क्रं.३ कातुर्ली, साजा क्रं.१३ बनगाव, साजा क्रं.१८ तिगाव, साजा क्रं.१० दहेगाव, शुक्रवारी (दि.५) साजा क्रं.४ कालीमाटी, साजा क्रं.१४ आमगाव, साजा क्रं.१९ अंजोरा, साजा क्रं.११ ठाणा, शनिवारी (दि.६) साजा क्रं.६ कट्टीपार, साजा क्रं.१५ पदमपूर, साजा क्रं.२० वळद, साजा क्रं.६ सरकारटोला येथील ग्रामपंचायत भवनात सकाळी ११ ते ५ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. याचा परिपूर्ण लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार साहेबराव राठौड यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
महिलांचे गाव पातळीवरील उद्यापासून मेळावे
By admin | Published: July 31, 2016 12:29 AM