सभेला सचिव शालीकराम लिचडे, कोषाध्यक्ष तेजराम मोरघडे प्रामुख्याने उपस्थित होते. सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आजीवन सभासद फी, ऑडिट करणे, कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांचे आधारकार्ड व पासपोर्ट फोटो जमा करणे तसेच समाजोपयोगी विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, समाज भवन परिसरात विकासकामांना नगर परिषद बांधकाम सभापती राजकुमार कुथे व महिला व बालकल्याण सभापती नेहा नायक यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी सहसचिव सुखराम हरड़े, यशोधरा सोनवाने, संचालक संजय मुरकुटे, वरुण खंगार, वीणा सोनवाने, अतुल खोब्रागडे, नामदेव सोनवाने, मनोज भंडारकर, अनिल मुरकुटे, उमेश भांडारकर, श्याम लिचडे, सचिन पालांदुरकर, प्राजक्ता रणदिवे, हर्षा आष्टीकर, ज्योती किरणापुरे, जयश्री वार्जुरकर, पद्मा भदाडे, मीनाक्षी रहमतकर, वर्षा तिडके, अनिता डोंगरे यांच्यासह अन्य समाजबांधव उपस्थित होते.