सूचना- दर महिन्याच्या कोणत्या मंगळवारी,याचा बातमीत उल्लेख करावा.
बोंडगावदेवी : ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासनाच्या विविध लोकोपयोगी आरोग्यसेवेचा लाभ विनामूल्य मिळावा. महागडा सल्ला व औषधोपचार ग्रामस्थांच्या दारापर्यंत मिळावा म्हणून चान्ना बाक्टी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरवार) नावीन्यपूर्ण आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याला प्राथमिकता देत आहे.
गावखेड्यातील जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जाणे शक्य नसल्याने मानसिक आजारग्रस्तांना सल्ला, मार्गदर्शन व औषधोपचार करण्याची सोय प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्यातून येणाऱ्या मंगळवारला सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्वी सामान्य जनतेवर प्राथमिक उपचार केले जात होते. मानसिक आजारग्रस्तांची तपासणी व औषधोपचार ग्रामीण रुग्णालयात होत असे. गावखेड्यातील सर्वसामान्य जनतेला मानसिक आजाराविषयी योग्य मार्गदर्शन होत नव्हते. परिसरातील जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरवार) यांनी ग्रामीण भागातील जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणातील मनोविकारतज्ज्ञ प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात मनोविकार रुग्णांवर वेळीच औषधोपचार करण्यासाठी गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील मनोविकारतज्ज्ञ डॉ. लोकेश चिरवतकर आपल्या संपूर्ण टीमसह महिन्याच्या मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध राहून सेवा देत आहेत. मनोविकाराचे लक्षण, कारणे सांगून रुग्णांची तपासणी करून महिनाभराची औषधी मोफतपणे वितरीत केली जात आहेत. परिसरातील जनतेने संधीचा लाभ घ्यावा, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी यांनी केले आहे.