लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातर्फे गोंदिया रेल्वे स्थानकालगत सात ते आठ कोटी रुपये खर्चून २००६ मध्ये व्यापारी संकुल तयार करण्यात आले होते. या माध्यमातून रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याचा उद्देश होता. मात्र मागील १३ वर्षांपासून हे व्यापार संकुल भाड्याने देण्यासाठी अनेकदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. अद्यापही याचा लिलाव झाला नसल्याने रेल्वेच्या व्यापारी संकुलाल भाडेकरु मिळत नसल्याचे चित्र आहे.गोंदिया शहर बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे.तसेच हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे.या रेल्वे स्थानकावरुन दररोज ४० हजारावर प्रवाशी ये-जा करतात. तर जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे.त्यामुळे गोंदिया येथे व्यापाराला मोठ्या प्रमाणात वाव आहे. याच दृष्टीकोनातून रेल्वे विभागाने २००६ मध्ये गोंदिया रेल्वे स्थानकारसमोरील मोकळ्या जागेत सात आठ कोटी रुपये खर्चून व्यापरी संकुल तयार केले.हे व्यापारी संकुल भाड्याने देऊन त्यातून रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याचा उद्देश होता. त्यामुळे रेल्वे विभागाने या व्यापारी संकुलाचे प्रती वर्षी २४ लाख रुपये निश्चित करुन ते भाड्याने देण्यासाठी आठ ते दहा वेळा निविदा प्रक्रिया राबविली.मात्र यात शहरातील किंवा शहराबाहेरील एकाही व्यापाऱ्यांने हे संकुल भाडेतत्त्वावर घेण्यासाठी तयारी दाखविली नाही.त्यामुळेच मागील १३ वर्षांपासून हे व्यापारी संकुल कुलूप बंद आहे. तर याच्या देखभाल दुरूस्तीकडे सुध्दा रेल्वे विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. रेल्वेने आता या व्यापारी संकुलाचे भाडे कमी करुन ते भाड्याने देण्याची तयारी सुरू केली असल्याचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.भाड्याची रक्कम अधिकरेल्वे व्यापारी संकुलाचे भाडे वर्षाकाठी २४ लाख रुपये निश्चित केले आहे.मात्र ऐवढे भाडे दिल्यानंतर त्यातून तेवढे उत्पन्न मिळणे शक्य नसल्याचे काही व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. शिवाय व्यापारी संकुलापासून काही अंतरावरच बाजारपेठ आहे.त्यामुळे ग्राहक या व्यापारी संकुलाकडे भटकण्याची शक्यता कमी आहे. परिणामी हे व्यापरी संकुल भाडेतत्त्वावर घेण्यास कुणीच तयार होत नसल्याची माहिती आहे.
कुलूप उघडणार का?रेल्वे विभागाने ज्या उद्देशाने सात आठ कोटी रुपये खर्चून व्यापारी संकुल तयार केले तो उद्देश अद्यापही साध्य झाला नाही.मागील १३ वर्षांपासून भाडेकरु न मिळाल्याने ते कुलूपबंद पडले आहे.त्यामुळे यासाठी केलेला खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे.तेवढाच खर्च रेल्वे विभागाने इतर ठिकाणी केला असता तर त्यातून चांगले उत्पन्न मिळाले असते असे आता रेल्वे विभागाचे अधिकारीच बोलत आहे.व्यापारी संकुल परिसरात असामाजीक तत्त्वांचा वावरगोंदिया रेल्वे स्थानकासमोरील व्यापारी संकुल रिकामे पडले आहे. तसेच त्याच्या बाजुला मोकळी जागा असून या ठिकाणी जुगाराचा अड्डा तयार झाला आहे. तर काही दारुड्यांनी या ठिकाणी ओपन बार चालू केला आहे. शिवाय असामाजीक तत्त्वांचा सुध्दा या परिसरात वावर वाढला आहे.याकडे रेल्वे विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.