अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती पी.जी. कटरे होते. बक्षीस वितरक म्हणून शाळा विकास समितीचे उपाध्यक्ष जगदीश येरोला तर पाहुणे म्हणून प्राचार्य शेख, व्हि.एस.नेवारे, नंदा गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या आदित्य भूरे, हर्ष ठाकूर, अरुण लिल्हारे व डॉली चौधरी यांचा सत्कार करण्यात आला, तर बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी म्हणून विज्ञान विभागातून शिवानी मेश्राम, शीतल चौरागडे, शीतल भेलावे, तर कला विभागातून अंजली बागडे, वैशाली बोपचे व शंतनू भेलावे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी येरोला यांनी, गुणवंत झालात, आता नामवंत व्हा आणि पुन्हा सत्कार करण्याची संधी द्या, यासाठी जिद्दीने कार्य करा, असे मत व्यक्त केले. कटरे यांनी, यशवंत, प्रतिभावंत व कीर्तिवंत होण्यासाठी ध्येय ठेवा व ते साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. शेख यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, म्हणून हा उपक्रम सुरू केला, असे सांगितले. प्रास्ताविक व्ही.एस. नेवारे यांनी केले. संचालन वैशाली चौधरी यांनी केले. आभार बॅनर्जी यांनी मानले.