ऑनलाईन लोकमतबोंडगावदेवी : आजच्या धकाधकीच्या जीवनात कुणाकडेही वेळ नाही. प्रत्येकच आपल्या कुटूंबाच्या सुख वैभवासाठी दिवस-रात्र राबतो. घराशेजारी इसमाची खुशहाली विचारण्याची व शेजाºयांशी सौजन्य दाखविण्यासाठी वेळच नाही. त्यातच व्यावसायीक, शासकीय नोकरीवाले यांना इतरांशी संवाद साधण्याला वेळच नाही, असे असले तरी ज्यांचा सामाजिक दायित्वाचा पिंड आहे. आपल्या ज्या समाजातून प्रगतीचे शिखर गाठले, त्या समाजासाठी आपलाही खारीचा वाटा, त्याग कामी यावा समाजहित हित साधून सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारी स्विकारतात.अशाच वृत्तीचे सडक-अर्जुनी येथील जि. प. कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल मेश्राम हे बोंडगावदेवी परिसरातील अनाथ मुलांना मदत करण्यासाठी धावून आले.निष्काम कर्मयोगी, संसाराचा त्याग करुन हे विश्वच माझे घर समजून दिनदुबळ्यांची सेवा करणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अनाथांच्या घरी प्रत्यक्ष जावून जीवन उपयोगी वस्तू तसेच रोख रक्कम भेट देऊन, खूप शिका, मोठे व्हा असा मौलिक उपदेश मेश्राम गुरूजींनी दिला.शिक्षकी पेशात असणारे अनिल मेश्राम यांनी परिसरातील अनाथ मुलांसोबत एक दिवस घालून त्यांना पालकत्वाचा आधार दिला. काही झाले तरी चालेल परंतु शिक्षण सोडू नका, वेळोवेळी मदत करण्यासाठी धावून येवू असा त्या अनाथ मुलांशी हितगुज साधतानी आशावाद व्यक्त केला.बोंडगावदेवी येथील सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांनी परिसरातील अनाथ मुलांची आपबीती कहानी मेश्राम यांना सांगितली होती. गोंदियाच्या डॉ. सविता बेदरकर यांनी अनिल मेश्राम गुरुजींना मदतीसाठी प्रवृत्त केले होते. जन्मदात्या मायबापाचे छत्र हिरावून अनाथ झालेले येथील उमेश (१६) व अमिती (११) या दोन भावंडाच्या झोपडीवजा घरी अनिल मेश्राम व सविता बेदरकर यांनी भेट दिली. त्या दोन भावांना गहू, तुरीची डाळ, साखर, अल्पोपहाराचा पॉकीट व रोेख रुपये दिले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य साधू मेश्राम, मुख्याध्यापक खंडाईत, भोई समाजाचे युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर मेश्राम उपस्थित होते. बाक्टी येथील स्नेहा मेश्राम, विराज मेश्राम, प्रज्वल सांगोळे उपस्थित होते. इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या स्नेहाला सावित्री फुल्यांच्या चरित्राची पुस्तक भेट देऊन सावित्रीची लेक तु आहेस, उंच भरारी घे अशी प्रेरणा दिली. इंझोरी येथील मायबापाची माया हिरावलेल्या काजल शेंडे (१३) ही चान्नाच्या मिलींद विद्यालयात ७ व्या वर्गात शिकत असल्याने तेथे जाऊन तिची भेट घेतली. यावेळी जि.प.प्राथ. शाळेतील अनाथ मुलांना अन्नधान्य व रोख रक्कम दिली. याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष मंदा मांढरे, मोहन नाकाडे, ओमप्रकाश वासनिक, छाया मदने उपस्थित होते. निमगाव येथील अनाथ होऊन आजीसोबत राहत असलेले रोशन व आशिष कांबळे या दोन अनाथ भावांची भेट प्रत्यक्षात शाळेत घेतली. त्यांच्याशी हितगुज साधून त्या दोन भावांना अन्नधान्यासह, तेल व इतर साहित्य देण्यात आले. रोख रक्कम दिली.
अनाथ मुलांसाठी मेश्राम गुरुजींची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:36 AM