लोकमत न्यूज नेटवर्कमुरदोली : स्वीफ्ट कार व मेटॅडोरची आपसांत धडक होऊन दोन्ही वाहनांतील १० जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजतादरम्यान गावाजवळ घडली. यात मेटॅडोर चालकाचा फाय फ्रॅक्चर झाला असून उर्वरीतांना किरकोळ मार लागला.प्राप्त माहितीनुसार, विजय बाबूराव चव्हाण (४५, भंडारा), निळकंठ समुनिया (४३), सुनील गजानन हटवार (४४,रा.तुमसर), ईश्वर कोरे (४३) व फुंडे (रा.आमगाव) व फुंडे हे गडेगाव (भंडारा) येथील अशोक लेलँड कंपनीत कार्यरत असून ते स्वीफ्ट कार क्रमांक एमएच ३६- झेड ४२९८ ने मांडोदेवी व हाजराफॉल बघून भंडारा येथे परत जात होते.तर मेटॅडोर क्रमांक एमएच २७- सी ७४० गोंदिया येथील श्याम ट्रेडर्समधील टाईल्स साकोली येथे सोडून परत जात होता. गावाजवळ रविवारी (दि.२५) रात्री ९ वाजतादरम्यान दोन्ही वाहनांची आपसांत धडक झाली. या धडकेत कारमध्ये बसलेले पाचही जण जखमी झाले. मेटॅडोर चालक धनराज वंजारी (रा.अदासी-तांडा) यांचा पाय फॅ्रक्चर झाला. तर गाडीतील अनिल नान्हू पुंगळे, धनराज नामदेव इंगोले (रा.कारंजा), विनेंद्र रामदार भेलावे, रूपेश जगन्नाथ भेलावे व ग्यानी भट यांना किरकोळ मार लागला. जखमींना १०८ क्रमांकाच्या वाहनाने गोंदियाला पाठविण्यात आले.
मेटॅडोर व कारची आपसात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:17 PM
स्वीफ्ट कार व मेटॅडोरची आपसांत धडक होऊन दोन्ही वाहनांतील १० जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजतादरम्यान गावाजवळ घडली. यात मेटॅडोर चालकाचा फाय फ्रॅक्चर झाला असून उर्वरीतांना किरकोळ मार लागला.
ठळक मुद्देमुरदोली येथील घटना : दोन्ही वाहनांतील १० जण जखमी