शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

२६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी मिलिंद रंगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 11:07 AM

तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा(रेल्वे) येथे दिनांक८ व ९ डिसेंबर २०१८ ला होऊ घातलेल्या २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक व नाटककार मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा(रेल्वे) येथे दिनांक८ व ९ डिसेंबर २०१८ ला होऊ घातलेल्या २६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक व नाटककार मिलिंद रंगारी यांची निवड करण्यात आली आहे.मुंडीकोटा (रेल्वे) येथील झाडीबोली साहित्य मंडळाच्या पुनर्गठन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून मिलिंद रंगारी यांच्या नावाची घोषणा केली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, २५ वे संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर, गोंदिया जि. प.चे सदस्य मनोज डोंगरे, मुंडीकोटा ग्रा.पं. चे सरपंच कमलेश आतिलकर, कवी डोमा कापगते, मुंडीकोटा झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष भाऊराव नागमोती, सचिव फ.रा.काटवले, राजेन्द्र पटले, राजेश डोंगरे व पदाधिकारी उपस्थित होते.मिलिंद रंगारी यांचा जन्म गोंदिया जिल्ह्यातील मानेगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला असून एम.एस्सी.बी.एड.,एम.ए.(शिक्षणशास्त्र,समाजशास्त्र), पी.जी.डीप. वि.जी.(मुंबई) असा त्यांचा शैक्षणिक आलेख आहे. सालेकसा तालुक्यातील पंचशील हाय.व कनिष्ठ महाविद्याल मक्काटोला येथे त्यांनी मागील २१ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले असून सध्या ते जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसाय विकास संस्था गोंदिया येथे समुपदेशक या पदावर कार्यरत आहेत.मिलिंद रंगारी हे साहित्यिक, कवी व नाटककार असून आतापर्यंत त्यांचे 'झाडीची माती','बोनस मिळणार आहे','रुद्रावतार वसुंधरेचे', 'झाडीचा राजा हरिश्चंद्र','शिदोरी' हे साहित्य प्रकाशित झाले आहेत. 'आकांत-एक विषारी चक्र','घायाळ', 'चक्रव्यूह जीवनाचे', 'राजकारण', 'अधुरी एक कहाणी', 'पुण्याई आई बाबांची', 'शाळा शिक रे पोरा' ही नाटकं संपूर्ण झाडीपट्टीमध्ये गाजली आहेत.'टर्निंग पॉईंट' हा त्यांचा शैक्षणिक एकपात्री प्रयोग असून 'गुप्तहेर', 'बळी', 'कहर', 'आपली मानसं', 'नवजीवन', 'पोरगी पराली पाटलाची', 'आधार कुणाचा', 'जगा आणि जगू दया', 'धग' इत्यादी साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद व भजेपार येथील झाडीबोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवले आहे. आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील 'भवभूती नाट्य पुरस्कार' व 'मुकुंदराज काव्य पुरस्काराने' त्यांना सन्मानित करण्यात आले. ते म.रा. शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे नागपूर विभागीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे विदर्भ विभागीय सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ आमगाव चे सदस्य व झाडीबोली साहित्य मंडळाचे गोंदिया जिल्हा प्रमुख अशा विविध साहित्य व सामाजिक पदांवर कार्यरत आहेत. त्यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे संपूर्ण साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात आनंद व्यक्त केल्या जात आहे.

टॅग्स :literatureसाहित्य