हेटी परिसरात सुमारे ५०० एकरांत ऊस पिकाची लागवड केली जाते. त्यापैकी २०० एकरांतील ऊस मळणीकरिता शेतकरी गहाणे यांच्याकडे शेतकरी आणतात. शेतकऱ्यांना देव्हाडा येथे साखर तयार करण्यापेक्षा गहाणे यांच्याकडे गूळ तयार करुन बाजारात विकणे सोयीचे होत आहे. गहाणे यांनी ऊस मळणी यंत्र लावल्याने परिसरातील ५०-६० बेरोजगार युवकांना ४ महिने रोजगार मिळत आहे. त्याचे समाधान गहाणे यांना आहे. गहाणे यांच्याकडे विनारासायनिक प्रक्रियेने गूळ तयार केला जातो. तालुक्यात १०८ गावे असून त्यात फक्त ३ गूळ मळणी यंत्र बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी धान पिकापेक्षा उस पिकाची लागवड करून जास्त आर्थिक उन्नती केली पाहिजे, असे गहाणे सांगतात.
ऊसमळणी यंत्रातून लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:17 AM