७० हजाराचा दंड : देवरीचे तहसीलदार विजय बोकडे व चमूची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : विना रॉयल्टीने गौण खनीज चोरी करणाऱ्या आठ ट्रॅक्टरवर सोमवार (दि.२६) देवरीचे तहसीलदार विजय बोकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. यातून ६० ते ७० हजार रुपये दंड वसूल होणार असल्याचे सांगण्यात आले.या कारवाईत सोमवारला शिलापूर, मकरधोकडा, चिचेवाडा, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व शेडेपार रस्त्यावरून विना रॉयल्टीने रेती, गिट्टी, मुरुम, विटा वाहून नेत होते. असे आठ ट्रॅक्टर पकडण्यात आले. गौण खनीज अधिनियम अंतर्गत कारवाई करुन अंदाजे ६० ते ७० हजार रुपयांचा दंड वसूल करणार असल्याचे तहसीलदार विजय बोकडे यांनी सांगितले. यामध्ये सुभाष आचले पुराडा (ट्रॅक्टरवर क्रमांक नाही), अनिल दयाराम बिसेन वडेगाव (एमएच ३५ जी ६२७२), सतिश मोतीराम झिंगरे देवरी (ट्रॅक्टर क्रमांक नाही), माधोराव मारोतराव तरोणे (एमएच ३५ जी ५३७१) सडक अर्जुनी, मनोज पंचम शाहू (एमएच ३५ जी २९५९), ब्रम्हदास सावजी बडोले सडक अर्जुनी (ट्रॅक्टर क्रमांक नाही), आनंदराव गणपत कठाणे मुरदोली (एमएच ३५ जी ४१८२) यांच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे.सदर कारवाई तहसीलदार विजय बोकडे व त्यांचे सहकारी तलाठी चव्हाण, नरेश तागडे, एस.पी. तीतरे, मुंढरे, टी.आर. गजबे, यु.एफ. सिंधीमेश्राम मंडळ निरीक्षक यांनी केली.विशष म्हणजे बहुतेक ट्रॅक्टर हे नवीन असून आरटीओ द्वारे पासिंग न करताच अवैध गौण खनिज चोरी करताना आढळले. अनेक दिवसापासून तालुक्यात अवैध गौण चोरी खुलेआम होत होती.परंतु तहसीलदार विजय बोकडे यांनी पदभार सांभाळताच मोठा दणका दिला. विना रॉयल्टीने गौण खनीज चोरणाऱ्यांवर दररोज कारवाई त्यांच्याकडून होत असून शासनाला राजस्व प्राप्त होत आहे.
गौण खनिज चोरी; आठ ट्रॅक्टर पकडले
By admin | Published: June 27, 2017 1:03 AM