शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

कृषी विभागाकडून शासनाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 11:54 PM

दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती.

ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : जिल्ह्यात ७८ टक्के रोवणी झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरुन घुमजाव करीत जिल्ह्यात आत्तापर्यंत ७८ रोवण्या झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडूनच प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे.यंदा आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातही सातत्याने नसल्याने धानापिकांना त्याचा फटका बसला. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस झालेल्या केलेली रोवणी देखील वाळत आहे. तलाव, बोड्या व धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. एकंदरीत पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरात आवत्यांसह ७८ टक्के रोवण्या झाल्याची नोंद केली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असताना मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी रोवणी केलीच नाही. मग कृषी विभागाने ७८ टक्के रोवणीची नोंद घेतलीच कशी? असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी एक लाख ३९ हजार ८७०.२० हेक्टरमध्ये करण्यात आली. यात रोवणी एक लाख ३० हजार ५७४.२० हेक्टरमध्ये तर आवत्या ९ हजार २९६ हेक्टरमध्ये असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून दमदार पाऊस झालेला नाही. मग कृषी विभागाने रोवणीची एवढी नोंद केली कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीबाबत रोवणी न झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. मात्र अद्यापही कृषी विभागाला अद्यापही सर्वेक्षणाला सुरूवात केली नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देणे टाळले.आतापर्यंत ७१०.२० मिमी पावसाची नोंदसद्यस्थितीत जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थितीसुद्धा वाईटच आहे. जिल्ह्यात १ जून ते ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण सरासरी ७१०.२० मिमी पाऊस झाला आहे. यात गोंदिया तालुक्यात सरासरी ७७० मिमी पाऊस, गोरेगाव ७४५.२० मिमी, तिरोडा ६७९.९ मिमी, अर्जुनी-मोरगाव ९५४.२० मिमी, देवरी ५०६.८० मिमी, आमगाव ७९७.१० मिमी, सालेकसा ६९० मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात सरासरी ५३१.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.धरणामंध्ये अत्यल्प साठासद्यस्थितीत जिल्ह्यातील नदीनाले व तलावही आटले आहेत. काही मोठ्या धरणांमध्येही पाण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे असल्याचे चित्र आहे. सध्या इटियाडोह धरणाला १९०.२३ दलघमी जलसाठा आहे. शिरपूर धरणात २७.२३ दलघमी, पुजारीटोला धरणात १९.९२ दलघमी, कालीसराडमध्ये ५.७६ दलघमी, संजय सरोवरमध्ये २५०.१३ दलघमी जलसाठा आहे. तसेच देवरी येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी ०.६२ मीटर व रजेगाव येथे वाघ नदीतील पाण्याची पातळी ०.९५ मीटर आहे. पाटबंधारे विभागानुसार, धोक्याची पातळी २७७.३० मीटरच्या वर असताना सद्यस्थितीत असलेली पाण्याची पातळी खूपच अत्यल्प आहे.गेल्या ३५ वर्षांत प्रथमच धरणाच्या पातळीत घटयंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्केच पावसाची नोंद झाली. परिणामी धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९८२ नंतर म्हणजे ३५ वर्षांनी धरणाची पातळी ऐवढी खालावली असल्याचे सांगितले.