ऑनलाईन लोकमतगोंदिया : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या तब्बल २५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच झाल्याने त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन जवळपास आठ महिन्याचा कालावधील पूर्ण होत आहे. परंतू अद्यापही यातील घोळ संपलेला नाही. कर्जमाफीसाठी शासनाकडून दररोज नवीन निकष लावले जात असल्याने सहकार विभागासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा तणावात आहे. कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन राबविली जात असल्याने बरेच पात्र शेतकरी सुध्दा अपात्र ठरत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या तीन याद्या तयार केल्या जात आहे. यात ग्रीन, येलो आणि रेड याद्यांचा समावेश आहे. ग्रीन यादीतील शेतकरी कर्जमाफीस पात्र तर येलो यादीतील शेतकऱ्यांच्या अर्जांमध्ये त्रृट्या असल्याने प्रलबिंत व रेड यादीत समावेश असलेले शेतकरी कर्जमाफीस अपात्र ठरविले जात आहे.ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून सहकार विभाग आणि बँकाना पाठविली जात आहे. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा केली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कृषी कर्जाची उचल करणाºया शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जिल्हा बँकेने एकूण १ लाख ७ हजार ६१९ शेतकऱ्यांना २६५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. यापैकी आत्तापर्यंत ५१ हजार १४१ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यांच्या बँक खात्यावर १३२ कोटी ३५ लाख ५३ हजार रुपये जमा करण्यात आले. यामध्ये १४ हजार ५३७ नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेतंर्गत २५ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले. तर दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या ३२३२ शेतकऱ्यांना ओटीएस योजनेतंर्गत कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या पाहता अद्याप अर्धे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे.चुकीच्या मोबाईल क्रमांकाने केला घातकर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरताना शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक होते. त्याशिवाय अर्ज संकेत स्थळावर अपलोड होत नव्हते. त्यामुळे बºयाच आॅनलाईन केंद्र संचालकांनी चुकीचे मोबाईल क्रमांक टाकले. तर काही अर्जांवर शेतकऱ्यांनी भरलेली माहिती आणि बॅँकाची माहिती जुळत नसल्याने हजारो शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरले.बँकेला ग्रीन यादीची प्रतीक्षाशेतकरी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची ग्रीन यादी मुंबई येथील आयटी विभागाकडून बँकेला पाठविली जात आहे. मात्र जिल्हा बँकेला अद्यापही उर्वरित शेतकऱ्यांची ग्रीन यादी प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
२५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मिस मॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 12:56 AM
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजनेतंर्गत शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली.
ठळक मुद्दे५१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी : अर्ध्या शेतकºयांचे वेट अॅन्ड वॉच