शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

शिक्षण विभागाचे मिशन ड्रॉप बॉक्स निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:28 AM

एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या दुसºया वर्षीही सारखी असायला पाहीजे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दुसºया वर्षात यंदा १५७५ विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी मिशन ड्राप बॉक्स सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे१५७५ शाळाबाह्य मुले शोधणार : १७५ बालरक्षकांना दिल्या वेगवेगळ्या टिप्स

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या दुसºया वर्षीही सारखी असायला पाहीजे. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत दुसऱ्या वर्षात यंदा १५७५ विद्यार्थी गेले कुठे हे शोधण्यासाठी मिशन ड्राप बॉक्स सुरू करण्यात आले आहे. यामाध्यमातून ही संख्या शुन्यावर आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने सुरू केला आहे.आमगाव तालुक्यातील १०८, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २३१, देवरी तालुक्यातील १८६, गोंदिया तालुक्यातील ७६०, गोरेगाव तालुक्यातील १०२, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६९, सालेकसा तालुक्यातील ५५, तिरोडा तालुक्यातील ६४ असे एकूण १५७५ बालके ड्राप बॉक्स मध्ये आहेत. त्या बालकांची संख्या शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मिशन ड्राप बॉक्स निरंक करण्यासाठी जोमाने सुरूवात केली आहे.यासाठी बालरक्षक कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. जिल्ह्यातील २०२ बालरक्षकांनी समता व जिल्ह्यातील लिंकमध्ये नोंदणी केली आहे. १७५ बालरक्षकांनी या कार्यशाळेला हजेरी लावून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणायचे यावर टीप्स घेतल्या.ड्राप बॉक्स निरंक कसे करता येईल यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार जिल्ह्यातील शिक्षण विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थ्यांची संख्या शुन्यावर कशी आणता येईल यावर माहिती देण्यात आली.विद्यार्थी निहाय माहिती कशी काढावी,शाळाबाह्य मुलांची सांख्यीकी माहिती, उपाययोजना, नियोजन व केस स्टडी लिहिण्याची पद्धत, बालरक्षक नोंदणी लिंक व टास्क लिंक यावर सखोल माहिती देऊन यंत्रणा कामाला लागली आहे.प्रत्येक मूल शाळेच्या मुख्यप्रवाहात आले पाहिजेत. त्यासाठीच बालरक्षक चळवळ सुरु करण्यात आली आहे. बालरक्षकांमध्ये आत्मीयता व सहानुभुतीची आवश्यकता आहे. याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले.काय आहे ड्रॉप बॉक्स?मोहीम इयत्ता पहिली ते सातवी पर्यतंच्या मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उर्तीण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि यंदा पुढील वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या काढली जाते. मागीलवर्षी जेवढे विद्यार्थी उर्तीण झाले तेवढ्याच विद्यार्थ्यांची पटसंख्या पुढील वर्गात असणे आवश्यक आहे. मात्र ती मागीलवर्षीच्या तुलनेत १५७५ ने कमी आढळली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतला अथवा हे विद्यार्थी शाळाबाह्य झाले किंवा त्यांचे दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरण झाले. याचा शोध घेण्याच्या मोहीमेला मिशन ड्रॉप बॉक्स हे नाव देण्यात आले आहे.११ दिवसात शून्य गाठाबालरक्षक व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी ११ दिवसात ड्रॉप बॉक्स मधील विद्यार्थी संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम करण्याचे शिक्षणाधिकारी(प्राथ) उल्हास नरड यांनी सांगितले. बालरक्षक चळवळ गतीने होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी