शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

मोक्षधाम बनले ‘डम्पिंग यार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:54 PM

शहरात निघणारा ओला व सुका कचरा नगर परिषदेसाठी डोकेदुखी असून ही डोकेदुखी आता शहरवासीयांसाठीही घातक ठरत आहे. शहरात दररोज निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसराला कचऱ्याचा वेढा वाढतच चालला आहे.

ठळक मुद्देकचरा विल्हेवाटीची समस्या : प्रकल्पाशिवाय तरणोपाय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात निघणारा ओला व सुका कचरा नगर परिषदेसाठी डोकेदुखी असून ही डोकेदुखी आता शहरवासीयांसाठीही घातक ठरत आहे. शहरात दररोज निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसराला कचऱ्याचा वेढा वाढतच चालला आहे. मात्र नगर परिषदेकडे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे मोक्षधाम परिसरच ‘डंम्पींग यार्ड’ बनले आहे. शहराचा विकास होत असतानाच शहराचा व्यास व लोकसंख्याही वाढतच चालली आहे. यासोबतच लोकांच्या गरजाही वाढल्या असून त्यानुसार त्यांच्यापासून शहरात निघणारा कचराही वाढतच चालला आहे. हेच कारण आहे की, शहरात दिवसाला ६५ मेट्रीक टन कचरा निघतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात निघत असलेल्या कचºयाची विल्हेवाट लावणेही तेवढेच जिकरीचे काम झाले आहे. त्यात नगर परिषदेकडे घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प नसल्यामुळे अधिकच समस्या वाढली आहे. परिणामी नगर परिषदेकडून शहरातील मोक्षधाम परिसरात कचरा टाकला जात आहे. यामुळे आजघडीला या परिसरात बघावे तिकडे कचऱ्याचे ढिगार दिसून येत आहेत. नगर परिषदेचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प झाल्यास कचऱ्याची समस्या चांगल्याने सोडविता येवू शकते. मात्र तोपर्यंत आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत नगर परिषद शहराला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यांतर्गत नगर परिषदेकडून ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ निर्मितीचा प्रयोग केला जात आहे. शहरात निघणाऱ्या ६५ मेट्रीक कचऱ्यात २९ मेट्रीक टन कचरा ओला राहत असून ३६ मेट्रीक टन कचरा सुका राहतो. अशात गांडूळ खत निर्मितीचा प्रयोग ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सहायक ठरत असून यात नगर परिषदेला यश आले आहे. शिवाय सुका कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे.प्रकल्पासाठी लवकरच जागेची खरेदीघन कचरा व्यवस्थापन प्रकल्प तयार करण्यासाठी नगर परिषदेने जवळील ग्राम रतनारा येथे जागा बघितली आहे. सुमारे १० एकर असलेल्या या जागेची मोजणी झाली असून नगर परिषदेने जागा खरेदीसाठी सर्वसाधारण सभेत ठराव घेतला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविला जाणार असून त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर शासकीय दराने जागेची खरेदी केली जाणार आहे. यात ३० टक्के जनरल फंड तर ७० टक्के रक्कम १४ व्या वित्त अयोगातून उभी केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगीतले.

टॅग्स :dumpingकचरा