शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

टवाळखोरी, छेड काढाल तर 'दामिनी' कडाडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 4:43 PM

गर्दीच्या ठिकाणी पथकाच्या भेटी : महिला, मुली व बालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महिला, मुली व बालकांना अडचणीच्या वेळी तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक कार्य करीत आहे. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईही केली जात आहे.

पोलिस व जनता यांच्यात सुसंवाद वाढावा, मुली, महिला व बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, त्यांना सुरक्षितता वाटावी व तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने दामिनी पथक स्थापन करण्यात आले आहे. हे पथक गर्दीच्या ठिकाणी भेट देत आहे. 

महिला, मुली व बालकांशी संवाद साधून त्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून संकटकाळात डायल-११२ या हेल्पलाइन क्रमांकावर कसा संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करीत आहेत. गस्त घालण्यासाठी दामिनी पथकाला अत्याधुनिक वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून, शहर व परिसरातील गर्दीच्या ठिकाणी गस्त घालत आहे. 

शाळा-महाविद्यालयांत जाऊन तेथील विद्यार्थिनींना कायदेविषयक माहिती, वाहतुकीचे नियम, ऑनलाइन फसवणूक कशी टाळावी आदींची माहिती दिली जात आहे. यामुळे महिला, मुली व लहान बालकांना दिलासा मिळत आहे. 

काय आहे दामिनी पथक? मुली, महिला व बालकांबाबत होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा बसावा, या उद्देशाने पथकाची स्थापना केली आहे. पीडितांना तत्काळ मदत मिळावी, यादृष्टीने पथक काम करते. सध्या ठिकठिकाणी पथकाकडून जनजागृती केली जात आहे.

तर रोमिओगिरी नेईल ठाण्यात गोंदिया शहरातील परिसरात दामिनी पथक गस्त घालत आहे. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणा- यांवर पथकाकडून कारवाई केली जात आहे. रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी टवाळखोरी केल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जातो.

या ठिकाणी निर्भया पथकाचा वाँचमहाविद्यालय : शाळा-महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग परिसरात दामिनी पथक भेट देत आहे. तेथील विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे धडेही दिले जात आहेत. तसेच जनजागृती केली जात आहे.

बसस्थानकबसस्थानक, रेल्वेस्थानक, मुख्य बाजारपेठ आदी गर्दीच्या ठिकाणी दामिनी पथक लक्ष ठेवून असते. साध्या वेशातही पोलिस अंमलदार गस्त घालतात.

गर्दीचे ठिकाण :धार्मिक स्थळांच्या परिसरात महिला भाविक, मुलींना सुरक्षित वाटावे, यासाठी दामिनी पथकाकडून भेटी दिल्या जातात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया