शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

मलमपट्टीसाठी मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:44 AM

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त येणाºया केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे.

ठळक मुद्देडॉक्टरांचा अजब कारभार : वैद्यकीय महाविद्यालय नावापूरतेच, आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त येणाºया केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांची मोठी हेळसांड होत आहे. गंभीर रूग्णांनासुद्धा तास-तासभर उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागते. तर मलमपट्टीसाठी पैसे मोजावे लागतात. ऐवढेच नव्हे तर डॉक्टरांनी रुग्णांना पाच दिवसांचे औषध लिहून दिल्यानंतर फार्मासिस्ट मात्र तीनच दिवसांचे औषध देतात. हा सर्व प्रकार लोकमत चमूने बुधवारी या रुग्णालयाच्या फेरकफटका मारला असता उघडकीस आला.जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाने येथे जिल्हा सामान्य रुग्णालय सुरू केले. अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यासाठी आलेल्यांनाही दोन-दोन तास पर्यंत वाट पहावी लागते.मात्र या रुग्णालयातील कर्मचाºयांच्या चुकीच्या धोरणामुळे येथे येणाºया रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना औषधे तसेच योग्य उपचार मिळत नसल्याची ओरड नागरिकांची होती. दोन दिवसांपूर्वी काही दोन रुग्णांनी लोकमत कार्यालयात येवून त्यांची कैफियत मांडली होती. याचीच दखल लोकमत चमुने बुधवारी (दि.१५) रुग्णालयाचा फेरफटका मारला. त्यात रुग्णांची ओरड योग्य असल्याची बाब पुढे आली.दरम्यान या सर्व प्रकाराबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी आपण बैठकीत असल्याचे सांगत यावर अधिक बोलण्यास नकार दिला.२० रुपये मोजल्यावरच मलमपट्टीरतनारा येथील शिवाजी नागरिकर (४७) यांचा दुचाकी स्लिप होवून ९ आॅक्टोबरला अपघात झाला. यात त्यांच्या अंगठ्याला जखम झाली. त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात १० रूपयांची शुल्क भरून चिठ्ठी काढली व डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी करण्यासाठी त्यांना पट्टीबंधक विभागात पाठविले. मात्र तेथे कार्यरत कर्मचाºयाने त्यांच्याकडे २० रूपयांची मागणी केली. पैसे द्याल तेव्हाच मलमपट्टी होईल. अन्यथा परत जा, असे सांगितले. शासकीय रूग्णालयात पैसे द्यावे लागत नाही, असे मला वाटले. पैसे न दिल्यामुळे मलमपट्टी न झाल्याने त्यांना तासभर वाट पहावी लागली. शेवटी पैसे दिल्यावरच सदर सदर कर्मचाºयांने मलमपट्टी करुन दिल्याचे सांगितले. हाच प्रकार त्यांच्यासोबत बुधवारी (दि.१५) सुध्दा घडला.पट्टीबंधक विभागात पैसे घेतल्याशिवाय मलमपट्टी केली जात नाही. विशेष म्हणजे जखमेनुसार मलमपट्टीचे पैसे घेतले जातात. त्याची कुठलीही पावती रुग्णांना दिली जात नाही. ही देखील या दरम्यान पुढे आली.पाच दिवसांऐवजी केवळ तीन दिवसांचे औषधजिल्हा सामान्य रूग्णालयात सुरू असलेल्या ओपीडीमध्ये रूग्णांची तपासणी करणारे डॉक्टर त्यांना पाच दिवसांचे औषध लिहून देतात. मात्र रूग्ण जेव्हा औषध वितरण विभागात जातात तेव्हा त्यांना तेथील कर्मचाºयांकडून केवळ तीन दिवसांचे औषध दिले जाते. कर्मचारी रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचा सल्ला देतात. वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पुरेसा औषधसाठा असल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याचा सल्ला दिला जात असल्याची बाब सुध्दा निदर्शनास आली.शस्त्रक्रियेसाठी लागतो ‘वशीला’गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय आल्यानंतर बीजीडब्ल्यू व केटीएस येथील कारभार अधिष्ठाता यांच्या हातात गेला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या रूग्णांची शस्त्रक्रिया या वैद्यकीय महाविद्यालयात करण्यासाठी नातेवाईकांनी रूग्णाला आणल्यावर त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. येथील डॉक्टरांना पैश्याची अपेक्षा असते की काय कामच होत नाही. एखादे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार किंवा बड्या अधिकाºयांचा फोन त्या डॉक्टरांना आल्याशिवाय रूग्णांची शस्त्रक्रियाच होत नाही. गरीब रूग्णांना शस्त्रक्रियेसाठी ‘वशीला’ (जॅक) लावावा लागतो. येथील रूग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्यामुळे शस्त्रक्रियेस उशीर होत असल्याची ओरड डॉक्टरांची असते.गंभीर रूग्ण दोन तास एक्स-रेसाठी रांगेतरतनारा येथील सरिता लिल्हारे या महिलेच्या डोळ्याजवळ व डोक्यावर जखम झाल्याने तिला तिच्या कुटुंबीयांनी जिल्हा रूग्णालयात आणले होते. ती महिला सकाळी ९ वाजतापासून ११ वाजतापर्यंत एक्स-रे साठी रांगेत बसून होती. दोन तासांच्या नंतरही तिला एक्स-रे साठी बोलाविण्यात आले नाही. त्यामुळे तिची प्रकृती अधिक बिघडत चालली होती. रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तिच्यासह कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल