शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

कर्जमाफीचे बँकेत आलेले पैसे गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 9:34 PM

शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देयोजनेचा फज्जा : शेतकऱ्यांमध्ये असंतोष, बँक अधिकाऱ्यांचे मौन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.महाराष्ट्र शासनाने ऐतिहासीक कर्जमाफी जाहीर केली. या योजनेअंतर्गत एकमुस्त समझोता घडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. मात्र यातही अनेक अफलातून प्र्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचे उत्तर ना प्रशासनाजवळ, ना बँक व्यवस्थापनाजवळ आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविण्यात आले, मात्र कर्जाचा डोंगर कायमच असल्याने शेतकºयांत नाराजीचा सूर आहे.अनिल लंजे या शेतकऱ्याने १० डिसेंबर २०१४ रोजी स्थानिक विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून १ लक्ष ३२ हजाराचे पीक कर्ज घेतले होते. ही कर्जराशी थकीत झाली होती. शासनाने २०१७ मध्ये शिवाजी महाराजांचे नाव देऊन ऐतिहासीक कर्जमाफी केली.लंजे यांना या योजनेतंर्गत लाभ मिळण्यासाठी आपण पात्र असल्याचे विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अर्जुनी-मोरगाव यांचे २० डिसेंबर २०१७ चे पत्र मिळाले. यात दीड लाख रुपयांचे कर्जमाफ होऊ शकते. मात्र दीड लाख रुपयांच्यावर असलेल्या राशीचा बँकेत रोख भरणा करावा लागेल असा उल्लेख आहे.त्यानुसार लंजे यांनी २२ जानेवारीला बँकेत २० हजाराचा रोख भरणा केला. मात्र या २० हजार रुपयांची लंजे यांच्या बँक खात्यात कुठेही नोंद नाही. याऊलट २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे खात्यात ९४६५ रुपयांचा भरणा केला आहे व ५ मार्च रोजी या रकमेची कपात करण्यात आली आहे. त्यांचे भरलेले २० हजार रुपये गेले कुठे? हा सुध्दा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. आपल्याला कर्जमाफी मिळाली असेल याची शहानिशा करण्यासाठी ते बँकेत गेले तेव्हा कर्जमाफी अद्याप झालेली नाही, असेच उत्तर दिले जाते.बँकाकडून टोलवाटोलवीलंजे यांना यासंदर्भात भंडारा बँक मुख्यालयात जावून चौकशी करावी असे सांगीतल्या गेले. त्यानंतर त्यांनी भंडारा येथे जावून चौकशी केली तर ते अर्जुनी-मोरगावच्या बँकेतच जावून चौकशी करा असे उत्तर देण्यात आले. दरम्यान बँकाकडून नुसती टोलवाटोलवी सुरु आहे. कर्जमाफी मिळेल या आशेने उसनवारी करुन बँकेत २० हजार रुपये रोख भरले मात्र कर्जमाफी मिळाली नाही. उलट बँकेच्या पायऱ्या झिजवून मला मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्याचा प्रकार बँकेने चालविला आहे. शासनाची ऐतिहासीक कर्जमाफी योजना फसवेगिरीची असल्याचा आरोप लंजे यांनी केला आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीतालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. बँकेत कर्जमाफीची राशी जमा होऊन शिल्लक राशी दर्शविण्यात आली. या कर्जमाफीच्या जमा झालेल्या राशीची नोंद ४० ते ५० दिवसापर्यंत कर्जदारांच्या खाते पुस्तिकेत राहिली मात्र कालांतराने पुन्हा ही राशी परत घेऊन त्यांचेवर पूर्वीसारखीच कर्जाची राशी कायम आहे. यामागील रहस्याचा उलगडा होऊ शकला नाही. कर्जमाफीच्या या गुत्थात तालुक्यातील अनेक शेतकरी गुरफटलेले आहेत. याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी