शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

इटखेडा येथे माकडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 10:11 PM

तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथे सध्या माकडांचा हैदोस सुरू असून कौलारू घरांचे अतोनात नुकसान होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : नुकसान भरपाईची मागणी

ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथे सध्या माकडांचा हैदोस सुरू असून कौलारू घरांचे अतोनात नुकसान होत आहे. या माकडांना पिटाळून लावण्यास गेले असता ते उलट आक्रमण करीत आहेत. याबाबत अर्जुनी-मोरगाव वनपरीक्षेत्राधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ईटखेड्याचे माजी सरपंच उद्धव मेहेंदळे यांनी केली आहे.इटखेडा येथे मागील दोन वर्षांपासून माकडांनी गावात उच्छाद मांडला आहे. वानरांचे कळप घरांवर उड्या मारत असल्याने घरावरील कवेलू फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरते. महागडे कवेलु खरेदी करून लाकूड फाट्यांनी छताची नेहमी दुरुस्ती करणे गरीबांच्या जीवावर आले आहे. एवढेच नव्हे तर घरातील अन्न पदार्थ सुद्धा माकडे पळवून नेतात. परसबागेतील वांगी, टमाटर व इतर भाजीपाल्याची नासधुस करतात.महिला व लहान मुलेच नव्हे तर पुरुषांवर सुद्धा माकड आक्रमण करतात. प्रसंगी चावाही घेत असल्याने ईटखेडावासी भयभीत झाले असून लगतच्या ग्राम ईसापूर येथील गावकरीही त्रस्त झाले आहेत. गावकऱ्यांनी घरावर ताडपत्र्या मांडल्यात, परंतु काही ठिकाणी छत पडले आहेत.वन्यप्राण्यांनी यापूर्वी केलेल्या हल्ल्यात जीवसुद्धा गमवावा लागला आहे. आताही अस्वलाचे दर्शन नेहमीच गावकऱ्यांना घडत आहे. वन्यप्राण्यांच्या भितीने आता ईटखेडावासी ग्रासले आहे.वनपरिक्षेत्रअधिकारी तसेच जिल्हा वनअधिकारी यांनी ईटखेडा-ईसापूर गावातील माकडांच्या टोळ्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे व गावातून माकडांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मेहेंदळे यांनी दिला आहे.