शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

डांबरी रस्त्यांना मुरूमाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:21 PM

आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाकडून केले जात आहे. मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्दे राष्टÑीय महामार्ग विभागाचा प्रताप : पावसामुळे मुरूम गेले वाहून

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाकडून केले जात आहे. मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.आमगाव- देवरी मार्गावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. आठ दहा दिवसांपूर्वीच रस्त्यांवरील खड्यांमुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही अपघाताची मालिका सुरूच आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे या विभागाने दुर्लक्ष केल्याने या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला होता. याचीच दखल राष्टÑीय महामार्ग विभागाने मागील पाच सहा दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली. डांबरी रस्त्यांवरील खड्डे चुरी आणि डांबराचा वापर करुन बुजविले जातात. मात्र या विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मुरूमाचा वापर केला. विशेष सर्वच खड्डे मुरूम टाकून बुजविले जात असल्याने नागरिकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूमाने बुजविण्याच्या प्रकारावर आक्षेप घेतला. मात्र संबंधीत विभागाच्या अधिकाºयांनी त्याला फारसे गांर्भीयाने घेतले नाही. आमगाव-देवरी मार्गावर अजूनही काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.दरम्यान या विभागाच्या अधिकाºयांना यासंदर्भात माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले. विभागाकडून झालेल्या चुकीवर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला.नियम धाब्यावरडांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी चुरी आणि डांबराचाच उपयोग केला जातो. शिवाय हे खड्डे चुरी आणि डांबरणाचे बुजविण्याचा नियम आहे. मात्र या विभागाने हे सर्व नियम धाब्यावर बसून शासन आणि नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करित मुरूमाचा वापर करित आहे. या विभागाच्या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे तीन चार दिवसांपूर्वी मुरूम टाकून बुजविण्यात आले. मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे खड्डयांमध्ये भरलेले सर्व मुरूम वाहून गेले. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याचे चित्र होते.डांबरी रस्त्यावर चिखलराष्टÑीय महामार्ग विभागाकडून आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे खड्डयांमध्ये भरलेले मुरूम पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे डांबरी रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या मार्गावरुन वाहने काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.आमगाव-देवरी हा रस्तापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र दोन तीन वर्षांपूर्वी या रस्त्याची जबाबदारी राष्टÑीय महामार्ग विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी त्याच विभागाचीच आहे.- बी.आर.वासनिक, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.