लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विमुक्त भटक्या जमातीत कुंभार समाजाचा समावेश करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांकरीता महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ गोंदिया शाखेच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.शहरातील जयस्तंभ चौक येथून बुधवारी दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचला. या मोर्चात सहभागी जिल्ह्यातील कुंभारसमाजबांधवानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष सुरेश चितवे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून उदरनिर्वाहासाठी भटकंतीचे आयुष्य जगणाऱ्या कुंभार समाजाचा विमुक्त भटक्या जमातीत समावेश करण्यात यावा. कुंभार समाजातील विट, मटकी व मूर्ती व्यवसायाकरिता असलेल्या कुंभार खाणी समाजाला त्वरीत देण्यात याव्या, कुंभार समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देण्यात यावे,संत शिरोमणी गोरोबा काका यांचे जन्मगांव तेर जिल्हा उस्मानाबाद येथे विस्तृत विकास आराखडा तयार करून तेरचा सर्वांगीण विकास करण्यात यावा. तेर तीर्थक्षेत्रास अ दर्जा देण्यात यावा, मातीवरील रॉयल्टी माफ करण्यात यावी. समाजातील विट व्यावसायिकांना आवश्यक परवाना देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात यावे. कुंभार समाजातील ५० वर्षावरील निवृत्त व्यवसायीकाला एमआयडीसीमध्ये जागा देण्यात यावी, प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती बनविणे आणि विक्र ीवर बंदी करण्यात यावी.गोंदिया जिल्ह्यातील विट भट्टया कुंभारांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत उपलब्ध करुन देण्यात याव्या आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात गुड्डू चक्र वर्ती, ईश्वर चक्रवती,काशीनाथ कपाट, सुभाष वाघाडे, हेमंत चक्रवती, रवि प्रजापती, सुरेश प्रजापती, कुंवरलाल तेलासू यांच्यासह मोठया संख्येने कुंभार समाजबांधव सहभागी झाले होते.
कुंभार समाजबांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 9:46 PM
विमुक्त भटक्या जमातीत कुंभार समाजाचा समावेश करण्यात यावा, यासह अन्य मागण्यांकरीता महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ गोंदिया शाखेच्या नेतृत्वात बुधवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
ठळक मुद्देविमुक्त भटक्या जमातीत समावेश करा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन