लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, सेवानिवृत्ती वेतन द्या, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे; मात्र सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. उलट त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यामुळे हिम्मत असेल तर कारवाई आणि अंगणवाड्यांना हात लावून दाखवा असे आव्हान अंगणवाडी सेविकांनी सरकारला केले आहे.अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात बुधवारी(दि.२७) रोजी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले.गोंदिया जिल्ह्यात ५ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून ते कामबंद आंदोलनात सहभागी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद पूर्णपणे बंद असल्याचे चित्र आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन नव्हे तर वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्त वेतन देण्यात यावे, नियमित कर्मचाºयांप्रमाणे सोयी सुविधा देण्यात याव्या. त्यांच्या कामाचे स्वरुप निश्चित करुन त्यांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा देऊन सेवानिवृत्त वेतन देण्यात यावे.यासह अन्य मागण्यांना घेऊन अंगणवाडी सेविकांनी ११ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.कामबंद आंदोलनाला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लोटूनही सरकारने त्यांना कुठलेही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. सरकार अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांच्या मागण्यावर त्वरीत तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संकल्प अंगणवाडी सेविकांनी सोडला आहे.सरकारने अंगणवाडी सेविकांच्या संयमाचा बांध पाहू नये. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या योग्य असून त्या त्वरीत पूर्ण कराव्या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करु.- प्रेमलता तेलसे,जिल्हाध्यक्षम.रा. अंगणवाडी कर्मचारी संघटना.
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 9:03 PM
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करा, सेवानिवृत्ती वेतन द्या, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे; ....
ठळक मुद्देमागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही : जिल्ह्यातील ५ हजार सेविकांचा सहभाग