ऑनलाईन लोकमतगोंदिया : सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहेत हे पाहून बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून हा मोर्चा काढण्यात आला.मागील दोन वर्षापासून रखडलेली शिष्यवृत्ती त्वरीत द्यावी, एपीएससीच्या जागांमध्ये वाढ करावी, २४ हजार शिक्षकांची भरती महिनाभरात घ्यावी, तलाठी भरती तत्काळ घ्यावी, नागपूर करारानुसार विदर्भातील नोकर भरती घेण्यात यावी, आयटीआय करणाºया विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात यावे, उच्च शिक्षणात खासगीकरण थांबवून महाविद्यालय बंद करू नयेत, कंत्राटी पद्धतीने नोकरभरती घेणे बंद करावे, सरळसेवा भरती नियमीत घ्यावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क कमी ककरण्यात यावे अश्या विविध २० मागण्यांचा समावेश होता. या मोर्चाचे नेतृत्व इंजी. संजय मगर, दीपक बहेकार, देवेश शेंडे, शिलवंत मेश्राम, डी.एस. मेश्राम, रॉयल उके, शाहरूख पठाण, शुभम रहांगडाले, शिवम धुर्वे, प्रगती वाघमारे, राहूल इलमकर, रोशन मेंढे, विश्वजीत बागडे, संगीत साखरे, नागसेन मेश्राम, सुमित गेडाम, अतूल वाहने, सुजीत डहाट, सोनू गेडाम यांनी केले. या मोर्च्यात शेकडो सुशिक्षीत बेरोजगार सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
सुशिक्षित बेरोजगारांनी काढला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:31 AM
सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या वाढत आहेत हे पाहून बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय व समाज कल्याण विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन