अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सौंदड, बोपाबोडी, सिंदीपार येथे कटाईलोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : बोपाबोडी, सिंदीपार लगत असलेल्या रोपवन व वनविभागातील वृक्षांची जळाऊ लाकडांसाठी खुलेआम कत्तल होत आहे. रोज सकाळी सरपणाच्या मोळ्या घेऊन गावकरी स्वयंपाकासाठी घेऊन येतात. परंतु वन विभागातील अधिकारी निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रशासन २ कोटी वृक्ष लागवड करुन ४ कोटी वृक्ष लागवडीचे संकल्प घेत आहे. प्रशासन वृक्ष लागवड करीत आहेत. तर दुसरीकडे वनाधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने या क्षेत्रातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. सरपण घेऊन जाणाऱ्या गावकऱ्यांना अधिकारी पकडतात. मात्र त्यांच्या वनविभागाच्या कार्यालयापर्यंत न पोहचताच बाहेरच्या बाहेर मार्गी लावतात. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे.भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या या अधिकाऱ्यांवरही कारवाई न झाल्यास वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर मेहरबान आहेत का? असा सवाल नागरिकांना पडत आहे. अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये होत असलेल्या वनाची कत्तल थांबविण्यासाठी वनविभाग सपशेल अपयशी ठरला आहे.
रोपवन व वनविभागातील वृक्षांची सर्रास कत्तल
By admin | Published: June 19, 2017 1:30 AM