यावेळी जी मुले कोविड-१९ मुळे अनाथ झाली अशा एकूण ५ मुलांच्या संपूर्ण संगोपनाची जबाबदारी भारतीय जनता पक्ष घेणार असल्याची माहिती आ. विजय रहांगडाले यांनी दिली. तसेच पोस्ट कोविड रुग्णांचे तात्काळ सर्व्हे करून म्युकरमायकोसिसची लक्षणे असल्यास रुग्णांची माहिती तालुका प्रशासनाला कळविण्यात यावी, जेणेकरून वेळेवर उपचार करता येतील, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री मदन पटले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, कृउबास सभापती डॉ. चिंतामण रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, कृउबास संचालक चत्रभुज बिसेन, माजी सभापती डॉ. वसंत भगत, माजी पं. स. सदस्य पवन पटले, डॉ. बी. एस. रहांगडाले, सरपंच कमलेश आतीलकर, माजी सरपंच राजेश रहांगडाले, मनोहर बुद्धे, हुपराज जमईवार उपस्थित होते.
कोरोना योद्ध्यांचा आ. रहांगडाले यांच्या हस्ते सत्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:21 AM