लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन (आरटीओ) विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य संलग्न उपप्रादेशिक परिवहन कर्मचारी संघटना गोंदियाच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मात्र अद्यापही यावर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि.१) कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.या वर्षी ३० जानेवारीला मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी राज्य स्तरावर ठिय्या आंदोलन करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु शासन प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची नोंद घेतली नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी संवर्गाच्या संख्येचा विचार करता असलेली पदोन्नतीची नगण्य संधी व पदोन्नतीकरिता असलेले चार स्तर ( ब वर्ग फक्त १६ पदे ) व अपुºया मनुष्य बळामुळे जनतेस होत असलेला त्रास,जनमानसात होत असलेली मलिन प्रतिमा या सर्व बाबींचा विचार करु न संघटनेने प्रशासनास मोटार वाहन विभागाच्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करणेबाबत संघटनेच्या वतीने १६ डिसेंबर २०१६ ला प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने वेळोवेळी तत्कालीन परिवहन आयुक्तांसोबत चर्चा झाल्या होत्या. परंतु प्रशासनाने आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनास सादर करताना संघटनेने सादर केलेला प्रस्ताव विचारात न घेतल्याने संघटनेने ५ आॅक्टोबर २०१७ ला संघटनेने मूळ प्रस्तावात आतापर्यत प्रशासनाच्या मागणीनुसार यथायोग्य बदल करून आधारित प्रस्ताव सादर केला आहे.कर्मचाºयांच्या आकृतीबंध व कार्यालयीन रचना या समान महत्त्वाच्या अनेक मागण्या प्रशासन स्तरावर अकारण प्रलंबित आहेत. त्यामुळे परिवहन विभागातील वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यास मोठा धोका निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. सध्या पदोन्नतीस उपलब्ध असलेल्या वर्ग ब पदाची संख्या कमी करण्यात आल्याचा कर्मचारी संघटनेचा आरोप आहे. मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणे रेटण्याचा प्रयत्न शासन व प्रशासनाने सुरु ठेवल्यास नाईलाजाने त्याविरोधात संघर्ष तीव्र करावा लागेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी परिवहन कार्यालयासह राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलन केले आहे. या आंदोलनात प्रशांत मांडवेकर, डी.के.पुरी, सचिन गौरखेडे, गजानन काळे, औदुंबर चौधरी, फवरसिंग राठोड, राहूल कुरतोटवार, अविनाश बरडे, वैभव भदाडे, करूणा बसवनाथे, सविता राजूरकर, कल्पना कुलसुंगे, कल्पना उईके, आर.जी.सलामे, जी.ए.मानकर, व्ही.डी.काळबांडे यांचा समावेश होता.
उपप्रादेशिक परिवहन कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:38 AM