लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांनी प्रलबिंत मागण्यांना घेऊन ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. याच अंतर्गत मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी जि.प.समोर धरणे आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले.ग्रामसेवकांनी त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा धरणे आंदोलन केले. मात्र शासनाने प्रत्येकवेळी वेळ मारुन नेली. ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी संवर्गाची पाचव्या वेतन आयोगापासूनची त्रृटी अद्यापही दूर करण्यात आलेली नाही. यामुळे ग्रामसेवकांमध्ये रोष व्याप्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मंगळवारी सकाळपासून येथील जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. ग्रामसेवकांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्यकार्यकारी राजा दयानिधी यांना देण्यात आले. निवेदनातून ग्रामसेवक, ग्रामविकास पद रद्द करुन केवळ पंचायत समिती अधिकारी पद निर्माण करण्यात यावे, ग्रामसेवकांना प्रवासभत्ता शासन निर्णयाप्रमाणे देण्यात यावा, शैक्षणिक अहर्ता पदवीधर करावी, सन २०११ च्या लोकसंख्येवर आधारित सुधारित पदे वाढवून ती मंजूर करण्यात यावी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रृटी दूर करणे, सन २००५ नंतर नियुक्त ग्रामसेवकांना जुनी पेशंन योजना लागू करावी,आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात कार्तिक चव्हान, दयानंद फटींग, कमलेश बिसेन, सचिन कुथे, कविता बागडे, एल.आर.ठाकरे, सुनील पटले, सुरेश वाघमारे, ओ. के. रहांगडाले, सुषमा वाढई, सुभाष सिरसाम, रामेश्वर जमाईवार,परमेश्वर नेवारे यांचा समावेश होता.
ग्रामसेवकांचे जि.प.समोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:28 PM