गोंदिया : राज्यसेवेचे पूर्व परीक्षा सतत पुढे ढकलली जात असल्याने एमपीएससीची तयारी करणाऱ्या करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्य आयोगाने सन २०२० मध्ये जाहीर केलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली. त्यामुळे विद्यार्थ्यांंची मार्च महिन्यात राज्यात आंदोलन केले होते. त्यानंतर परीक्षा घेतली. परंतु त्या परीक्षेचा निकाल जाहीरच करण्यात आला नाही. कोरोनामुळे निकाल जाहीर झाला नाही असे कारण पुढे करून सरकार या प्रकारावर पांघरून घालत आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगाराची फौज निर्माण झाली आहे. हातात नोकरी नसल्याने तरुण वर्ग नैराश्याचा गर्तेतेत लोटत आहे. कोरोनाच्या पूर्वी पीएसआयची परीक्षा पास झालेल्यांंची शारीरिक चाचणी व मुलाखत अद्याप घेण्यात आली नाही. राजपत्रित अधिकाऱ्यांचीही पदे भरल्या गेली नाहीत. एमपीएससीमध्ये मोठा गोंधळ असल्याने याचा वाईट परिणाम तरुण वर्गावर होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
..........................................
या वर्षीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार?
- कोरोनामुळे यंदा परीक्षा होणार किंवा नाही हे कुणीच सांगू शकत नाही. मागील दोन-अडीच वर्षांपासून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा बरोबर घेतल्या जात नाही. राज्य लोकसेवा आयोगाकडे परीक्षेचे नियोजन नाही.
- राज्य लोकसेवा आयोगाची तयारी करणारे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. अनेक विद्यार्थी नैराश्याच्या गर्ततेत सापडले आहेत. एमपीएससीची तयारी करणारे तरुण-तरुणींच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे.
......................
ऑनलाइन क्लास किती दिवस चालणार?
१) मागील दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग असल्याने ऑफलाइन क्लास घेण्यावर शासनाची बंदी आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लास घेतले जातात. ऑनलाइन क्लास किती दिवस घेतले जाईल हे निश्चित सांगता येत नाही.
२) ऑनलाइन क्लासमध्ये संकल्पना स्पष्ट होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत. त्यामुळे या क्लासलाही प्रतिसाद कमी मिळत आहे.
३) या क्लासला प्रतिसाद मिळत नसला तरी क्लासचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ऑनलाइन क्लासेस चालविले जाते.
.................................
क्लास चालक अडचणीत मागील १८ महिन्यापासून शासनाने ऑफलाइन क्लासेसवर बंदी आणली. ऑनलाइनला प्रतिसाद मिळत नाही. गोंदिया जिल्ह्यात असलेले क्लासेस चालकच बेरोजगार होत आहेत. क्लासेस चालविण्यासाठी लागणारा पैसा निघत नाही. प्रवेशाची चिंता आहे. क्लास चालक कर्जबाजारी झाले आहेत.
- देवीदास शेंडे, क्लास चालक
स्पर्धा परीक्षेची तयारी करवून देणाऱ्या क्लासेसला विद्यार्थ्यांसारखे सरकारने ग्राह्य धरले. त्यामुळे आमची स्थिती दयनीय आहे. क्लासेस बंद असल्या तरी क्लासेसकरिता वारलेल्या इमारतींचे भाडे मात्र द्यावेच लागत आहे. १८ महिन्यापासून आमची स्थिती बिकट आहे.
- सुशील वनकर, क्लास चालक
................
अन् ते वय ओलांडत चालले
- ऑनलाइनमधून आम्हाला फारसे समजत नाही न समजलेल्यांची प्रश्न विचारले तर त्याचे निरसरण होत नाही. दोन वर्षापासून तयारी करीत आहे. परंतु परीक्षा झालीच नाही. आता नुसती तयारीच करायची का, हा आमचा सरकारला सवाल आहे.
- सागर गायधने, विद्यार्थी
कोरोना काळात मोर्चे, आंदोलन, लग्न समारंभ, नेत्यांच्या सभा चालतात तर मग आमच्या परीक्षा का घेतल्या जात नाही. एमपीएससी परीक्षा कधी होणार याचे उत्तर नातेवाइकांना व मित्रमंडळींना देता-देता नाकी नऊ येते.
- सागर शिवणकर, विद्यार्थी