लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महावितरणचीही शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे.जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. सुरूवातीला समाधानकारक समाधानकारक पाऊस झाल्याने धानपिके सुध्दा चांगले आले आहे. त्यामुळे मागील वर्षी झालेले नुकसान भरुन काढू अशीे शेतकऱ्यांना आशा होती. सध्या हलके धान निघण्याच्या मार्गावर आहेत तर जड धानाला एका पाण्याची आवश्यकता आहे. पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेता सिंचन प्रकल्पातील पाणी सोडले जात आहे. काही शेतकरी नाल्यावर मोटारपंप लावून शेतीला पाणी करीत आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, ते शेतकरी मोटारपंपाने पाणी करतात. मात्र पावसाने पाठ फिरविली असताना आधीच शेतकºयांवर निसर्ग कोपला असताना त्यात महावितरणने सुध्दा भर घातली आहे.मागील आठ दहा दिवसांपासून महाविरणने ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ केली आहे. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भारनियमन सुरू केले जात आहे. आठ ते दहा तासांच्या भारनियमनामुळे शेतकºयांना पिकांना पाणी करण्याची अडचण होत आहे. तर सिंचनाची सोय असताना सुध्दा भारनियमनामुळे पिके गमविण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. चार पाच दिवसांत जड धानाला पाणी न केल्यास जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानपिके करपण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवरील चिंतेचे ढग वाढत आहे.भारनियमन बंद करापावसाअभावी धानपिके संकटात आली असून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. आधीच निसर्ग कोपला असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच भारनियमनामुळे हाती आलेली पिके गमविण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून महावितरणने भारनियमन बंद करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.किडरोगांचा प्रादुर्भाव वाढलावाढते तापमान आणि ढगाळ वातावरणामुळे धानपिकांवरील किडरोगात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.प्रशासनाची बघ्याची भूमिकामहावितरणकडून मागील आठवडाभरापासून ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्याची अडचण निर्माण झाली असून पिके संकटात आली आहे. शेतकºयांची गरज लक्षात घेता उपाययोजना करण्याची गरज असताना प्रशासनाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.
महावितरणची शेतकऱ्यांवर अवकृपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:57 PM
मागील महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्याने धानपिके संकटात आल्याने शेतकºयांवर निसर्ग कोपला आहे. त्यातच आता महावितरणने ग्रामीण भागात आठ ते दहा तासांचे भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी करण्यास अडचण जात असून निसर्गा पाठोपाठ महावितरणचीही शेतकऱ्यांवर अवकृपा झाली आहे.
ठळक मुद्देदोन लाख हेक्टरमधील पिके संकटात : जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती, पिके वाचविण्यासाठी धडपड