मुंबईसह राज्यातील परिमंडळांतर्गत येणाऱ्या कार्यालयातील वसुलीचा अल्प प्रतिसाद बघता स्पष्ट नाराजी व्यक्त करत ३० जूनपर्यंत शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याची ताकीद दिली आहे. कोरोना काळात वसुली ठप्प झाल्याने आर्थिक गणित कोलमडलेल्या महावितरणच्या वसुलीसाठी मुंबई कार्यालय, प्रादेशिक कार्यालयांकडून पाठपुरावा, आढावा घेण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेतील सर्व कर्मचाऱ्यांवर वसुलीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. महावितरणच्या गोंदिया-भंडारा परिमंडळाचा विचार केल्यास वसुलीचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेले नाही. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया व देवरी हे दोन परिमंडळ आहेत. या परिमंडळ अंतर्गत घरगुती, व्यापारीक, औद्योगिक व कृषी अशा विविध प्रकारचे थकीत बिल कोट्यवधीच्या घरात आहे. शासनाकडून विद्युत बिलामध्ये कोणतेही लाभ देण्यात आले नसल्याने लाभार्थ्यांना थकीत वीज बिल भरणे आवश्यक झाले आहे. परंतु, अनेक ग्राहक आज ना उद्या विद्युत बिलामध्ये सूट मिळेल, या लालसेने विद्युत बिल भरण्यास नकार देत आहेत. परिणामी अनेक ग्राहकांवर विद्युत बिलाचा बोझा वाढत चालला आहे.
थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणची धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:20 AM