लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करून विवाहितेचा वरवंटा व लोखंडी रॉडने मारून खून केला. परंतु सुनेच्या बचावासाठी आलेल्या वडिलाचाही खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा खून करून फासावर लटकविण्यात आले. असा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. मात्र वृत्त लिहिपर्यंत आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.अंजू मुन्ना शरणागत (२७) व सासरा कुवरलाल शरणागत (७५) रा. पिपरटोला (जांभूरटोला) ता. आमगाव अशी मृतांची नावे आहेत.अंजूचे लग्न २०११ मध्ये मुन्ना कुवरलाल शरणागत याच्याशी झाले होते. लग्न झाल्यापासून अंजूला हुंड्यासाठी त्रास द्यायचे. यासंदर्भात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे व पोलीस ठाण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. मात्र त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. एकाच घरातील दोघांचा खून झाला. अंजूला सासरचे जेव्हा हुंड्यासाठी त्रास द्यायचे तेव्हा तिच्या बाजूने सासरा कुवरलाल शरणागत असायचा. बुधवारच्या रात्रीला झालेल्या वादात लोखंडी सब्बल व वरवंट्याने मारून अंजूला खून करण्यात आला. अंजूच्या मदतीसाठी कुवरलाल आले असताना त्यांचाही खून करून हे प्रकरण कुवरलालवर यावे, यासाठी त्यालाही ठार करून फासावर लटकविण्यात आले. हे कृत्य अंजूचा पती मुन्ना कुवरलाल शरणागत व भासरा शिक्षक भुमेश्वर कुवरलाल शरणागत या दोन्ही भावांनी मिळून केल्याचा आरोप अंजूचे वडील खेमराज बिसेन व भाऊ भुमेश्वर बिसेन रा. ठाणाटोला ता. आमगाव, जि. गोंदिया यांनी केला आहे. माझ्या मुलगी व तिच्या सासºयाचा खूनच करण्यात आला असून याची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुन्ना व अंजू यांचा विवाह २०११ मध्ये झाला. त्या दोघांना ४ वर्षाचा एक मुलगा आहे. अंजूची सासू मोठा मुलगा गोरेगावच्या एका शाळेत शिक्षक असल्याने त्याच्याकडे गोरेगाव येथे राहते. सासरा मुन्नाकडे होता.सासरा होता सुनेचा हितेशीपरकीय मुलगी आपल्या घरी आली तिला सन्मानाची वागणूक द्या तिला हुंड्यासाठी त्रास देऊ नका,असे कुवरलाल म्हणत होता.अंजूला सासरचे मंडळी त्रास देत होते. सासरा कुवरलाल शरणागत नेहमीच अंजूची बाजू घेत होता. तेव्हा त्यालाही ठार करून तिच्या खूनात त्याला अडकविण्याचा घरच्यांचा प्रयत्न होता. असा आरोप आहे. हे सर्व कृत्य करुन सासरा स्वत: फासावर लटकला असता तर त्याची जिभ बाहेर निघाली असती.परंतु असे काहीच नव्हते. या दोन्ही खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी कुवरलालला फासावर लटकविण्यात आला. असा आरोप अंजूचे वडील खेमराज बिसेन व भाऊ भुमेश्वर बिसेन रा. ठाणाटोला यांनी केला आहे.
सून व सासºयाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:04 AM
सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ करून विवाहितेचा वरवंटा व लोखंडी रॉडने मारून खून केला.
ठळक मुद्देमुलीच्या वडिलांचा आरोप : आमगाव पोलीसात अद्याप गुन्हा दाखल नाही