शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

आईच्या प्रियकराचा काठीने मारून खून; अनैतिक संबधाला कंटाळून त्याने केला खून

By नरेश रहिले | Published: July 02, 2023 6:27 PM

विधवा महिलेशी चार वर्षापासून अनैतिक संबध ठेवणाऱ्या गवंडी काम करणाऱ्या मिस्त्रीचा एका १६ वर्षाच्या मुलाने काठीने मारून खून केला.

गोंदिया : विधवा महिलेशी चार वर्षापासून अनैतिक संबध ठेवणाऱ्या गवंडी काम करणाऱ्या मिस्त्रीचा एका १६ वर्षाच्या मुलाने काठीने मारून खून केल्याची घटना १ जुलैच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या बघोली येथे घडली. सुनील देवदास बांते (४०) रा. चांदोरी खुर्द असे मृताचे नाव आहे. त्याचा खून करणारा विधीसंर्षीत बालक हा १६ वर्षाचा आहे.

दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदोरी खुर्द येथील सुनील बांते (४०) हा आपल्या सोबत गवंडी कामावर बघोली येथील एका विधवा महिलेला नेत होता. ती विधवा असल्याने कामावरच या दोघांचे सूत जुळले. मृतक त्या महिलेलच्या घरी जात असल्याने ही बाब तिच्या मुलाला खटकत होती. यातूनच त्याने सुनील बांतेच्या डोक्यावर काठीने वार करून त्याचा खून केला. सुनील बांते हा नेहमी प्रमाणे १ जुलै रोजी कामावरून आल्यावर आपल्या घरी गेला. हातपाय धुतल्यावर तयार होऊन नेहमीप्रमाणे बघोली येथे गेला. बघोली येथे खूप दारू पिऊन तो चौकात बसून होता.

 इकडे-तिकडे फिरल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास तो घरी जायला निघाला. परंतु तो चांदोरी खुर्द गावाच्या २०० मीटर अंतरावरच त्याच्या डोक्यावर काठीने वार करून १६ वर्षाच्या बालकाने त्याचा खून केला. त्याच्या मृतदेहाच्या १ मीटर अंतरावर त्याची सायकल पडलेली होती. डोक्यावर जखमा होत्या. दवनीवाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सुकदेव राऊत, पोलीस शिपाई टेभेंकर, धनेश्वर पिपरेवार, हर्षे व गोंदियावरून श्वान पथक बोलविण्यात आले. त्या बालकाला ताब्यात घेतल्यावर त्याने या कृत्याची कबुली दिली. त्याच्याविरूध्द दवनीवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार वर्षापासून होते अनैतिक संबधमृतक सुनील बांते याचे विधीसंघर्षीत बालकाच्या आईसोबत मागील चार वर्षापासून अनैतिक संबध होते. मुलगा वयात येत असताना त्याला या सर्व गोष्टी समजू लागल्याने त्याने विरोध करण्याच्या आधीच खून करून त्याची कटकट संपविली. आपल्यासोबत तिला गवंडी कामावर घेऊन जात असतांना त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. महिनाभरापूर्वी दिली होती तंबीमृतक हा विधवा महिलेकडे नेहमीच जात असल्याने तू येऊ नको अशी तंबी त्या विधी संघर्षीत बालकाने मृतकाला महिनाभरापूर्वी दिली होती. परंतु मृतकाने त्याच्या धमकीला न जुमानता आपला प्रयोग सुरूच ठेवला होता. यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते. तासभरात आरोपीला अटकदवनीवाडा पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यानंतर गावातून माहिती घेतल्यानंतर त्यांना धक्कादायक माहिती हाती लागली. माहितीच्या आधारावर याप्रकरणाचा छडा लावीत पोलिसांनी आरोपीला तासाभरातच अटक केली.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू