महिलांचा व्यवसाय व शाश्वत उपजीविका सुरू करण्याच्या उद्देशातून त्यांना मशरूम लागवड प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. फक्त तीन हजार रुपयांच्या लागत खर्चातून २० ते २५ हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न या व्यवसायातून महिलांना मिळू शकते. अदानी फाउंडेशनच्या माध्यमातून १२० रुपये प्रमाणे बियाणे महिलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. १ किलो बियांपासून ४ बेड तयार होतात. अशाप्रकारे १०० बेड पहिल्या हंगामाला अपेक्षित आहेत. सप्टेंबर महिन्यापासून मशरूम लागवड करणे असल्याने त्यापूर्वी प्रशिक्षण सुरू करण्यात आले. एका हंगामात २५ हजारांचे उत्पन्न एका गरीब कुंटुबाला मिळू शकते व त्यांची आर्थिक परिस्थिती भक्कम करण्यासाठी हातभार लागू शकतो. या उद्देशातून प्रभागातील ७० महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी बांगरे, दीपा बेंद्रे, रेखा रामटेके यांनी विशेष मार्गदर्शन केले. संचालन हेमलता पटले यांनी केले. आभार वैशाली भैरम यांनी मानले. प्रशिक्षणासाठी मनोज बिसेन, प्रिया पटले, नम्रता गौतम, रूपाली चौधरी यांनी सहकार्य केले.
महिलांना दिले मशरूम लागवडचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:21 AM