लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाडी येथील ग्राम पंचायत सभागृहात गावातील महिला बचत गटातील सदस्या व पदाधिकाऱ्यांकरीता राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे लीडरशिप व उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रींगणगावकर होते. प्रमुख मार्गदर्शक नाबर्डचे डी.डी.एम. निरज जागरे, एल.डी.एम. दिलीप सिल्लारे, एफ.एल.सी.काऊंसलर रविंद्र पहिरे, राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, उपसरपंच सुभाष कावळे, तंटामुक्त अध्यक्ष डॉ. भगत, माविमचे बोरकर, कृषी सहायक लांजेवार उपस्थित होते.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.प्रास्ताविक व नाबार्डच्या विविध योजनेविषयी जागरे यांनी सविस्तर मागदर्शन केले. एलडीएम सिल्लारे यांनी लीडरशीप आणि उपजीवीकेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. रविंद्र पहिरे यांनी प्रधानमंत्री विमा योजना, अटल विमा, मुद्रा योजना, आयुष्यमान अशा विविध योजनेविषयी मार्गदर्शन केले.राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनी महिलांना गटाच्या व्यतिरीक्त ग्राम पंचायत कायदा १४ व्या वित्त आयोग व तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात येणाºया विविध कार्यक्रमात भाग घेण्याचे आवाहन केले. डॉ. भगत यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनातर्फे महिलांसाठी राबविण्यात येणाºया योजनाची माहिती दिली. े अध्यक्ष रिंगणगावकर यांनी महिलांनी अशा विविध योजनेचा लाभ घेवून स्वत:चा कुटुंबांचा आर्थिक विकास साधण्याचे आवाहन केले.संचालन धिरज मेश्राम यांनी केले तर आभार ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष कावळे यांनी मानले. कार्यक्रमात १०० महिलांची उपस्थिती होती.यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर व संस्थेचे कर्मचारी कैलाश कुर्वे यांनी सहकार्य केले.
नाबार्डचे उपजिविका प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:24 PM
तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाडी येथील ग्राम पंचायत सभागृहात गावातील महिला बचत गटातील सदस्या व पदाधिकाऱ्यांकरीता राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) तर्फे लीडरशिप व उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
ठळक मुद्देलीडरशिपवरही मार्गदर्शन : १०० महिलांची उपस्थिती