लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी व अर्जुनी मोरगाव नगरपंचायत नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) निवडणूक होत आहे. अर्जुनी मोरगाव नगरपंचायत वगळता इतर तीन नगरपंचायतमध्ये १७ सदस्य संख्या आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा पार करुन आपल्याच पक्षाचा नगराध्यक्ष विराजमान व्हावा. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.विशेष म्हणजे या चार नगर पंचायतमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही. त्यामुळे मागील अडीच वर्ष एकमेकांची साथ घेत सत्ता स्थापन केली होती. तेच समीकरण यापुढे देखील कायम राहावे. यासाठी राजकीय हालचालींना मागील आठवडाभरापासून वेग आला आहे. मात्र नगर पंचायतवर नेमकी कुणाची सत्ता स्थापन होते. याचे चित्र शुक्रवारी (दि.२५) स्पष्ट होईल. नगराध्यक्षपदासाठी नामाकंनपत्र दाखल करण्याची २१ मे ही तारीख होती. गोरेगाव नगर पंचायत नगराध्यक्षपदासाठी नगर विकास पॅनलचे आशिष बारेवार तर काँग्रेसतर्फे सीमा कटरे यांनी नामाकंनपत्र दाखल केले आहे. येथे सुध्दा कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही. मात्र सर्वात मोठा पक्ष भाजप आहे.नगर विकास पॅनलचे आशिष बारेवार यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. देवरी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेकरीता राखीव आहे.भाजपच्या कौशल कुंभरे, रॉष्ट्रवादी काँग्रेसच्या माया निर्वाण, दविंदरकौर भाटिया व विद्यमान नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी नामाकंनपत्र दाखल केले आहे. भाजपाने या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची तयारी पूर्ण केली आहे. विरोधी पक्षाच्या एका सदस्याला उपाध्यक्षपदाची आॅफर देऊन भाजपाने सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती आहे. तर पालकमंत्री राजकुमार बडोले यांचे गृह गाव असलेल्या सडक अर्जुनी नगर पंचायतवर मागील अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.येथे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देवचंद तरोणे तर अपक्ष सदस्य बाबादास येरोला, महेश सूर्यवंशी व काँग्रेसच्या ज्योती गिरीपुंजे यांनी नामाकंनपत्र दाखल केला आहे.त्यामुळे या चारही नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी कोणत्या पक्षाच्या सदस्याची वर्णी लागते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
नगर पंचायत नगराध्यक्षपदाची निवडणूक आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:34 AM
जिल्ह्यातील गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी व अर्जुनी मोरगाव नगरपंचायत नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यामुळे पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षाची निवड करण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) निवडणूक होत आहे.
ठळक मुद्देराजकीय हालचालींना वेग : फोडफोडीचे राजकारण सुरू, जिल्हावासीयांचे लक्ष