शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

फिरायला गेलेल्या मित्र-मैत्रीणीला केले नग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 9:23 PM

कारंजा येथील २० वर्षाची तरुणी व फुलचूर येथील २२ वर्षाचा तरुण हे दोघेही २९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता पांगडी जंगलात फिरायला गेले. ते परत येत असताना लोधीटोला येथील दोन तरुण व चुटीया येथील एक अशा तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्या मित्र-मैत्रिणीला नग्न केले.

ठळक मुद्देतिघांवर गुन्हा दाखल : अश्लिल व्हिडियो व्हॉट्सअ‍ॅपवर केला व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कारंजा येथील २० वर्षाची तरुणी व फुलचूर येथील २२ वर्षाचा तरुण हे दोघेही २९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता पांगडी जंगलात फिरायला गेले. ते परत येत असताना लोधीटोला येथील दोन तरुण व चुटीया येथील एक अशा तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्या मित्र-मैत्रिणीला नग्न केले. इतकेच नव्हे तर त्या तरुणीचा नग्न अवस्थेत लैगिंक छळ केला. यासर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार करुन व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करुन दोघांची बदनामी केली. या तिघांविरुद्ध गंगाझरी पोलिसात १७ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तिघांना ही अटक केली आहे.दोघे मित्र-मैत्रिणी पांगडी जंगलात फिरायला जात असताना पाऊस सुरु झाल्यामुळे ते जंगलातून परत गोंदियाकडे जाण्यासाठी निघाले. परंतु रस्त्यावर आरोपी मेघनाथ पटले चुटिया, विकेश उर्फ काका भय्यालाल गावराणे व रितीक संजू ठाकरे रा.लोधीटोला यांनी त्या तरुणाच्या गाडीला अडवून चाकूचा धाक दाखविला. त्यांना जंगलात ओढत नेवून दोघांचे दुपट्याने हात बांधले. एवढेच नव्हे तर त्या दोघांना झाडाला बांधून खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ८ हजार रुपये रोख बळजबरीने काढून घेतले. त्या मित्र-मैत्रिणीला बळजबरीने एकमेकास चुंबन घेण्यास सांगितले. त्यानंतर दोघांना नग्न करुन आरोपी रितीक ठाकरे व मेघनाथ पटले यांनी तिच्याशी अश्लिल चाळे करुन मोबाईलमध्ये शुटींग केली.या प्रकरणाची वाच्यता कुणाकडे केली तर युट्यूब व सोशल मिडीयावर तुझी बदनामी करु अशी धमकी दिली. त्यानंतर संजू ठाकरे यांनी लोधीटोला येथील त्या तरुणीचा मित्र दुर्गा अटरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तो अश्लिल विडीओ पाठविला. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा त्याचा दुसरा मित्र शनी यांच्यासमोर त्या मुलाला धमकावून १५ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर वायरल करु अशी धमकी दिली.तक्रारीवरुन सदर घटनेसंदर्भात गंगाझरी पोलिसांनी भादंविच्या कलम ३४१, २४२, ३५४ अ, ब, ३७६ ड, ३८५, ३९७, ५०४, ५०६ सहकलम ६६ ई, ६७, ६७ अ माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.सदर तिन्ही आरोपींना अटक केली असून मोबाईल व ८ हजार रुपये रोख स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले.