लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : माजी खासदार व भारतीय राष्ट्रीय किसान कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (दि.१) अग्निकांडात जळून भस्म झालेल्या दुकानांच्या सर्व दुकानदारांची भेट घेतली.याप्रसंगी पीडितांनी आपली व्यथा मांडत शासनाकडून काही आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली. यावर पटोले यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व प्रभारी जिल्हाधिकारी यांना फोन करून अदानी वीज प्रकल्पाच्या सोशल वेलफेयर फंडच्या माध्यमातून ताबडतोब आर्थिक सहाय्य करण्याची सूचना केली. तसेच स्वत: पुढाकार घेत २५ हजार रु पयांची पीडितांना रोख मदत करून पुढेही शासनाच्या माध्यमातून अधिक आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तर पीडित सर्व दुकांदारांतर्फे मागणीचे निवेदन पटोले यांना देण्यात आले.याप्रसंगी प्रदेश कॉँग्रेस सचिव डॉ. योगेंद्र भगत, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे, दलित आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पवन मोरे, संयोजक ठमेंद्र सिंह चव्हाण, बाजार समिती संचालक ओमप्रकाश पटले, सलाम शेख, संजय खियानी, शोभेलाल दहिकर, धनराज पटले, फारु ख मोतीवाला, धर्मेंद्र अतकरे, उज्वल कापसे, नितीन मेश्राम, दिलीप ढाले, लेखराज हिरापुरे, चंद्रपाल पटले व अनेक नागरिक उपस्थित होते.
नाना पटोले यांनी घेतली अग्निकांडातील दुकानदारांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 9:31 PM