अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर होत्या. नगर परिषद सदस्य भावना कदम व निर्मला मिश्रा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पाहुणे म्हणून ज्योत्सना शहारे, दिव्या भगत, मीना कुर्वे, श्रुती केकत, रेखा भरणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून तसेच कोरोना योद्धा म्हणून सेवा देत शहीद झालेल्यांना श्रध्दांजली वाहून करण्यात आली. सध्या कोरोना योद्धा म्हणून सेवा देत असलेल्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी बेदरकर यांनी, आजही महिलांकडे पुरूष प्रधान मानसिकतेमुळे डोळेझाक केली जाते. अशा पुरूष प्रधान मानसिकतेतून महिलांनी बाहेर पडणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कदम यांनी, नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे कधीही शक्य आहे. येणारे आव्हान समर्थपणे पेलण्याची किमया महिलांमध्येच आहे, असे प्रतिपादन केले. याप्रसंगी मुलींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. श्रद्धा आंबेडारे व टिना रोकडे यांनी संचालन केले. संयोजिका रूपाली रोकडे यांनी आभार मानले. याप्रंसगी नारी शक्ती महिला ग्रुपच्या सीमा खाडे, वंदना बावनकर, सुमन राऊत, फटिंग, स्वाती पवार, गीता राऊत, कोमल राऊत, कविता बारेवार, प्रीती सेलोकर, शुलका यादव, इंदुमती शुक्ला, तारा रोकडे, वीणा पवार, चंपा बिजेवार, ममता खाडे, पूजा खाडे, रोहिणी राऊत, उमेश्वरी राऊत, हितेश्वरी आंबेडारे, अर्चना बिजेवार, वर्षा रोकडे, त्रिवेणी कावळे आदी उपस्थित होत्या.
नारी शक्ती महिला ग्रुपने साजरा केला महिला दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:30 AM