गोंदिया : राष्ट्रीय एकता कलचुरी महासंघाची बैठक अग्रसेन भवनाच्या सभागृहात ४ आॅक्टोबर रोजी पार पडली. यात १ नोव्हेंबर रोजी परिचय संमेलन घेण्याचे ठरविण्यात आले. संमेलनात आसाम, पं.बंगाल, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील प्रतिनिधी भाग घेणार आहेत.अध्यक्षस्थानी प्रेमकुमार जायस्वाल होते. बैठकीत रमेंद्र जायस्वाल, डी.डी. डहरवाल, त्रिलोकनाथ शिवहरे, डॉ. राजेश पशिने, ललीत जायस्वाल, निरज कटकवार, मंगला जायस्वाल, जागृती जायस्वाल, दीपक जायस्वाल, शीतल मोहबे, अनिता महाजन यांनी आपलने विचार मांडले. दीपक जायस्वाल यांनी समाजाची एकता कायम ठेवून परिचय संमेलन यशस्वी करा, असे आवाहन केले.याप्रसंगी समाजबांधवांनी अतिथींचा व समिती सदस्यांचा सत्कार केला. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेत भंडारा, तुमसर, तिरोडा, आमगाव, मोरगाव-अर्जुनी, गोरेगाव, बालाघाट, नागपूर, अमरावती आदी ठिकाणातून मोठ्या संख्येत समाजबांधव सहभागी झाले होते. संचालन रमेश जायस्वाल यांनी केले. आभार अरूण नशीने यांनी मानले. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय एकता कलचुरी महासंघाची बैठक
By admin | Published: October 09, 2015 2:15 AM