एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा सुरू
गोंदिया : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २० ते २५ सप्टेंबर या कालावधीत (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) आणि २५ सप्टेंबर १ ऑक्टोंबर या कालावधीत (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) जिल्ह्यातील तीन उपकेंद्रांवर दोन सत्रात सकाळी ७.३० ते दुपारी १२ पर्यंत प्रथम सत्रात आणि दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत द्वितीय सत्रात छत्रपती शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉली, छत्रपती शिवाजी कॅम्पस, चिचगढ रोड, देवरी येथे. शासकीय तंत्रनिकेतन, फुलचूर पेठ, गोरेगाव रोड, गोंदिया येथे व राजीव गांधी इंडस्टीयर ट्रेनिंग सेंटर, स्नेहल टॉकीजच्या समोर, तलाव रोड, तिरोडा येथे घेण्यात येत आहे.
.........
३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी
गोंदिया : खरीप हंगाम २०२१-२२ ची धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकरी नोंदणी ३ सप्टेंबरपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे. तरी ज्या शेतकरी बांधवांना आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करायचे आहे त्यांनी खरीप हंगाम २०२१-२२ धानाचा सुधारित सातबारा, नमुना ८ अ, शेतकरी नोंदणी अर्ज, आधारकार्ड झेरॉक्स, बँक
पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रे आपल्या जवळच्या संबंधित धान खरेदी केंद्रावर नोंदणी
करण्याकरिता ३० सप्टेंबरपर्यंत जमा करावे. असे जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी
कळविले आहे.