लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : राष्ट्रीय पोषाहार सप्ताहा निमित्त अदानी फाऊंडेशतर्फे तिरोडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये पौष्टीक आहार ाबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये सहज व किफायतशिर दरात उपलब्ध होणाऱ्या खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या पोषण आहाराची माहिती देण्यात आली.‘सुपोषण’ कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर कार्य करणाऱ्या‘संगिनी’च्या माध्यमातून गावातील महिलांना आहाराविषयी माहिती दिली. पालेभाज्या, कडधान्यापासून तयार होणाºया खाद्य पदार्थाची माहिती देऊन गावामध्ये खाद्य पदार्थ प्रदर्शनीचे व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनीच्या माध्यमातून गावातील विद्यार्थी तसेच नागरिकांना शरीर निरोगी राहण्यासाठी व शरीराची योग्य वाढ होण्यासाठी पोषण युक्त आहार महत्वाचा असल्याचा संदेश देण्यात आला. डॉ. जयश्री पेंढारकर, यांनी महिलांना सकस आहाराविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या विविध शंकाकुशंकाचे निरासन केले. पालेभाज्या, कडधान्य, फळे यापासून पौष्टीक खाद्य पदार्थ कसे बनविले जातात याचे प्रशिक्षण दिले.या उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम तिरोडा येथील जि.प.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणावर नुकताच पार पडला.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्य पदार्थांची प्रदर्शनी भरविण्यात आली. या प्रदर्शनीचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अदानी फाऊंडेशनचे नितीन शिराळकर, प्राचार्य एन.एस.रहांगडाले, प्राचार्य मंत्री, मुख्याध्यापिका जे.वाय.टेंभरे,पारधी, हरिणखेडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खाद्य प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना भेट वस्तू देण्यात आल्या. जि.प.हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरोडा, एस.डी.बी.विद्यालय खैरबोडी, गिरीजा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरोडा, सरस्वती प्राथमिक शाळा तिरोडा, शहीद मिश्रा हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज तिरोडा या विद्यालयाच्या प्राचार्यांचा गटशिक्षणाधिकारी पी.पी.समरीत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सप्ताहा दरम्यान तालुक्यातील एकोडी, धामणेवाडा, गराडा, मलपुरी, बेरडीपार, मेंदीपूर, बरबसपूरा, चिखली, इंदोरा, निमगाव, सोनेगाव, चिरेखनी, कवलेवाडा, पुजारीटोला, बोदलकसा, सालेबर्डी, आलेझरी, विहिरगाव, मुंडीपार, मांडवी, जमुनिया, दांडेगाव, मेंढा, लोधीटोला, सुकडी, धादरी, ठाणेगाव, भिवापूर, खमारी या गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
३४ गावांमध्ये राबविला राष्ट्रीय पोषाहार सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:53 AM
राष्ट्रीय पोषाहार सप्ताहा निमित्त अदानी फाऊंडेशतर्फे तिरोडा तालुक्यातील ३४ गावांमध्ये पौष्टीक आहार ाबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये सहज व किफायतशिर दरात उपलब्ध होणाऱ्या खाद्य पदार्थातून मिळणाऱ्या पोषण आहाराची माहिती देण्यात आली.
ठळक मुद्देअदानी फाऊंडेशनचा उपक्रम : महिलांमध्ये जनजागृती