ऑनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेवार यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय लोक अदालत पार पडले. सर्व तालुक्यांमध्येही राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आले.जिल्हा न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर. त्रिवेदी, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इशरत ए. शेख-नाजीर, मुख्य न्याय दंडाधिकारी पी.एच. खरवडे, सह दिवाणी न्यायाधीश ए.बी. तहसीलदार, सहदिवाणी न्यायाधीश ए.एस. जरूदे, वासंती मालोदे, एन.आर. ढोके प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले. पक्षकारांना प्रकरणे निकाली काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात संपूर्ण जिल्ह्यातील एकूण दिवाणी २७९ दावे व फौजदारी ११३३ खटले असे एकूण १४२२ प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी दिवाणी १८ व फौजदारी ११० प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करण्यात आला. यामध्ये १५ लाख १० हजार ०२८ रूपयांचा महसूल शासनजमा करण्यात आला.यासोबतच ३४९२ पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणे, बँक व बीएसएनएल तसेच व्होडाफोन व फाळनांस कंपनीचे प्रकरणे ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७३ प्रकरणांमध्ये आपसी तडजोड करण्यात आली. यात २४ लाख दोन हजार २५९ रूपये वसूल करण्यात आले.लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी वकील वर्ग, सामाजिक कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
राष्ट्रीय लोक अदालतीची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:26 PM