लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : तालुका विधी सेवा समिती सडक-अर्जुनीच्या वतीने दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) सडक-अर्जुनी येथील न्यायदान कक्षामध्ये राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा करण्यात आला.या वेळी विधी स्वयंसेवक मीनाक्षी साखरे, भारती मेश्राम, संतोष बोरकर, इरसाद सैयद, चुलीराम कोरे यांनी राष्टÑीय विधी सेवेचे महत्व सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनातून दिवाणी न्यायाधीश वि.अ. साठे यांनी, विधी सेवा म्हणजे काय हे सांगून त्याचे महत्व सांगितले. तसेच त्यांनी राष्टÑीय विधी सेवा, राज्य विधी सेवा, जिल्हा विधी सेवा व तालुका विधी सेवा याद्वारे लोकांना कोणकोणत्या सवलती व सोयी मिळू शकतात, याची माहिती दिली.त्यांनी आपल्या मार्गदर्शनात, अशा शिबिराद्वारे लोकांना मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सहाय्य दिले जाते. दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न धारकांना दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोफत वकिलांची सेवा पुरविली जाते. तुरुंगात बंद असलेले कैदी, महिला, अज्ञान मुले, आदिवासी, अपंग व मानसिक रुग्ण जे आर्थिक रुपाने दुर्बल घटक तसेच मागासवर्गीयांना दिवाणी व फौजदारी खटल्याकरिता मोफत वकिलांचे सहाय्य पुरविले जाते. या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक गावात कायद्याची माहिती दिली जाते. जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण वेळ मोफत वकिलांची सोय उपलब्ध करुन दिली जाते. मोफत सल्ला देणाºया वकिलांचा मोबाईल क्रमांक प्रकाशित केला जातो. बाल न्यायालयातील पक्षकारांना व आरोपींना रिमांडच्या दिवशी देखील मोफत वकिलांची सेवा उपलब्ध करुन दिली जाते. राष्ट्रीय विधी सेवा दिवसानिमित्त १० दिवसांचा राष्ट्रीय विधी सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तसेच त्यांनी उपस्थित लोकांना या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी विनंती केली.याप्रसंगी न्यायालयातील सर्व विधिज्ज्ञ, नागरिक व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार अॅड.पी.के. रंगारी यांनी केले. शिबिरासाठी सहायक अधीक्षक, इतर कर्मचारी वर्ग, वकील मंडळी, विधी स्वयंसेवक आदींनी सहकार्य केले.
सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय विधी दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:06 AM