अर्जुनी मोरगाव : भौतिकशास्राचे नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमन यांचा २८ फेब्रुवारी हा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आला. युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून रमन यांना समुद्राच्य निळ्या रंगाच्या पाण्याचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. रमन आणि कृष्णन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरल्याची घटना शोधून काढली. त्याला रमन इफेक्ट म्हणून ओळखले जाते. १९५४ मध्ये भारत सरकारने रमन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यालयात विज्ञान समितीद्वारे वर्ग ५ ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी रमन यांच्या जीवनावर प्रश्नमंजूषा स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यालयातील ७९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. गट अ वर्ग ५ ते ७ प्रथम- परिनीता गजानन नाकाडे, द्वितीय - गायत्री पुंडलिक बेलखोडे, तृतीय- राजश्री गजानन बेलखोडे गट ब वर्ग ८ ते १० प्रथम-गौरी देवीदास राठोड द्वितीय-रुची शत्रुघ्न कापगते, तृतीय- अरविंद सुखदेव कापगते, पुष्पक मेघश्याम मुरकुटे, लता कृष्णा गहाणे, महेश जाधव राखडे, गट क ११ व १२ प्रथम-मनमोहन कृष्णराव लंजे, रोहित सुरेश कापगते, निखिल सोपान ढोरे, द्वितीय-वेदिका विकास गजभिये, दीपक देवानंद खोटेले, देवेंद्र नामदेव मडावी या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यांचे प्राचार्य अनिल मंत्री व पर्यवेक्षिका छाया घाटे यांनी अभिनंदन करून कौतुक केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विज्ञान समिती प्रमुख शिवचरण राघोर्ते, प्रा. ओंकार लांजेवार, प्रा. योगेंद्र गौतम, सुरेश कुंभारे यांनी सहकार्य केले.