या कार्यक्रमाला एम. बी. पटेल महाविद्यालय साकोली येथील डॉ. सी.जे. खुणे व डॉ. बी. बी. परशुरामकर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. यावेळी डॉ. के.एल. देशपांडे, डॉ. वर्षा गंगणे, डॉ. जयपाल चव्हाण, डॉ. चंद्रमणी गजभिये, डॉ. सुधीर भांडारकर, डॉ. सचिन चौरसिया, डॉ. अभिनंदन पाखमोडे, डॉ. त्रिमूर्ती लांबट, प्रा. उमेश चव्हाण, प्रा. शुभांगी मुनघाटे आदी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनीता रंगारी यांनी केले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष गडवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवकदेखील उपस्थित होते. कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. सुनील खलोदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस उत्साहात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:31 AM